महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळामध्ये काम करने सुलभ नाही .कामाचे तास , शिफ्ट मधील ड्युटी ,जेवणाच्या अनिश्चित वेळा, व्यायामाचा अभाव , शरीराला एकाच स्थितीत काम ,वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवाशांना हाताळणे , अवघड रस्ते , नआवडत्या कर्मचाऱ्यांसोबत चे ताणतणाव अशा अनेक समस्यांना चालक आणि वाहक दोघांनाही सामना करावा लागतो .हे एक दिवसाचे नाही तर रोजचेच असते.अशा वातावरणात मानसिक आरोग्य उत्तम असणे ही एकमेव उपाय असते .

15 मे 2025 रोजी मंत्रालयात महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची ( MSRTC )बैठक घेण्यात आली . कर्मचाऱ्यांसाठी समुपदेशनाच्या नेमणुकीची संकल्पना मांडण्यात आली .जेणेकरून कर्मचाऱ्यांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवता येईल .परंतु ही योजना थंड बस्त्यात आहे .कारण समुपदेशक एम .एस .डब्ल्यू असावा, शिवाय त्याला तीन वर्षाचा समुपदेशनाचा अनुभव असावा . त्याला मिळणारे मानधन चार हजार रुपये फक्त . या अटी शर्तीवर काम करणे कठीण आहे . अल्पशा मानधनावर समुपदेशक उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे अनुभवी समुपदेशक मिळणे कठीण जाते . 34000 चालक आणि 21 समुपदेशक अशी वर्तमान स्थिती आहे .
वाहन चालक हा तारणारा व मारणारा असतो .भूतकालीन घटनांचा आलेख घेता समुपदेशन योजना राबविण्यात येणे महत्वाचे ठरते.हवे ते आवश्यक बदल करण्यात यावे करून समुपदेशकांच्या संख्येत वाढ करण्यात यावी ,जेणेकरून एस . टी .महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा खेळ खंडोबा होणार नाही .याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी आपले लक्ष पुरवणे गरजेचे ठरते .एसटी कर्मचारी हा एक जिवंत माणूस आहे .महामंडळाला पूर्ण तारुण्य अर्पण करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सोयी मिळाल्याच पाहिजे .एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी धर्मवीर आनंदराव दिघे निशुल्क आरोग्य तपासणी योजना सारख्या अनेक उपयोगी योजना आहेत .कर्मचारी बांधव अधिक जागरूक होणे क्रमप्राप्त ठरते .
(यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी डॉ .मंजुषा सागर )






























