Homeआरोग्यमंगला एक्स्प्रेसमधील २५ विद्यार्थिनींना अन्नातून त्रास

मंगला एक्स्प्रेसमधील २५ विद्यार्थिनींना अन्नातून त्रास

पॅन्ट्री कारमधील अन्न खाल्ल्यानंतर पोटदुखी, जुलाब; भुसावळ मध्ये रेल्वेच्या वैद्यकीय पथकाकडून तपासणी..

पोलीस वार्ता, भुसावळ | रेल्वे गाडी नंबर 12618 अप- हजरत निजामुद्दीन-एर्नाकुलम, मंगला एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या होली फॅमिली स्कूलच्या सुमारे 91 विद्यार्थ्यांपैकी 25 ते 30 विद्यार्थिनींना रेल्वे गाडीतील जेवण जेवल्यानंतर पोटदुखी व जुलाबाचा त्रास झाल्याची घटना शुक्रवारी दि.28 ऑगस्ट रोजी रात्री समोर आली आहे. त्यानंतर भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वेच्या विविध विभागांच्या संयुक्त पथकाने विद्यार्थ्यांची तपासणी करून त्यांना औषधे व ओआरएस देण्यात आले. उपचारानंतर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
होली फॅमिली स्कूलचे विद्यार्थी हजरत निजामुद्दीन ते त्रिशूर असा प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान एस/३ डब्यातील काही विद्यार्थिनींना पोटदुखी व जुलाबाचा त्रास सुरू झाला. मंगला एक्स्प्रेस भुसावळ स्थानकावर पोहोचल्यानंतर आरपीएफ, सीआयबी, जीआरपी, स्टेशन मॅनेजर, रेल्वे वैद्यकीय, आरोग्य व वाणिज्य विभागाच्या पथकाने एस/२ व एस/३ डब्यांची पाहणी केली.
वैद्यकीय पथकाने सुमारे ४० ते ४५ विद्यार्थ्यांची तपासणी करून आवश्यक औषधे व ओआरएस देण्यात आले. प्राथमिक चौकशीत सुमारे ४५ विद्यार्थ्यांनी पॅन्ट्री कारमधील अन्नपदार्थ खाल्ल्याचे समोर आले. त्यापैकी २५ ते ३० विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचे आढळले.
पॅन्ट्री कारची तपासणी; साहित्य जप्त
घटनेनंतर आरपीएफ भुसावळ व वाणिज्य विभागाने पॅन्ट्री कारची संयुक्त तपासणी केली. यावेळी अमान्य पाण्याच्या बाटल्या तसेच काही खाद्यपदार्थ आढळून आले. पुढील तपास व आवश्यक कारवाईसाठी हे साहित्य वाणिज्य विभागाने जप्त केले.
विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी भुसावळ स्थानकावर उतरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, होली फॅमिली स्कूलच्या मुख्याध्यापिका मिस मिनी जॉन यांनी विद्यार्थ्यांना ट्रेनमधून उतरविण्यास नकार देत प्रवास सुरू ठेवण्यास सहमती दर्शविली. त्यानंतर विद्यार्थ्यांसह गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली.
मनमाडपर्यंत वैद्यकीय पथक सोबत
विद्यार्थ्यांची सतत वैद्यकीय देखरेख राहावी यासाठी डॉ. तालिबा (सीएमपी), डॉ. मोनिका (एडीएमओ), डॉ. रेशमी (एडीएमओ), चेतन फडणीस तसेच आयआरसीटीसीचे कर्मचारी केशव कुमार यांना भुसावळहून मनमाडपर्यंत विद्यार्थ्यांसोबत पाठविण्यात आले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!