Homeआरोग्यविधानसभा निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढण्यासाठी व्यापक जनजागृती करा; विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम

विधानसभा निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढण्यासाठी व्यापक जनजागृती करा; विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम

पाचही जिल्ह्यातील मतदार जनजागृती संदर्भातील उपक्रमांचा आढावा विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला.

पोलीस वार्ता, नाशिक: विधानसभा निवडणुकीत नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी आणि त्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी दिल्या.
स्वीप उपक्रमाच्या माध्यमातून पाचही जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार जनजागृती संदर्भातील उपक्रमांचा आढावा विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतला. त्यावेळी ते बोलत होते, पाचही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, स्विपचे नोडल अधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती. तसेच विभागीय आयुक्तालय येथे उपायुक्त सुभाष बोरकर, तहसीलदार पल्लवी जगताप, नगरपालिका प्रशासन शाखेचे उपायुक्त श्रीनिवास कुऱ्हे उपस्थित होते.
डॉ.गेडाम म्हणाले की, विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचून त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रवृत्त करणे, त्यासाठी मतदार जागृतीच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. पाचही जिल्ह्यात स्विपच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यातील मतदार जनजागृती साठी राबविण्यात येणाऱ्या संकल्पना इतर जिल्ह्यातही राबविण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी केली.
स्वीपच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातही मतदार जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे, असे सांगून डॉ.गेडाम म्हणाले की, मागील निवडणुकीपेक्षा यावर्षीच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात वाढावी यासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने आणि व्यापक प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या सोशल मीडियाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो आहे. त्यामुळे या घटकाचा उपयोग मतदार जनजागृतीसाठी करण्यात यावा. सोशल मीडियावर सक्रिय आणि लोकप्रिय असणाऱ्या घटकांची यासाठी मदत घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.
स्वीपच्या माध्यमातून होणारे विविध उपक्रम सर्व घटकापर्यंत पोहोचावे यासाठी विशेष प्रयत्न करण्याची सूचनाही त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजता या वेळेत मतदान होणार आहे. प्रत्येक पात्र मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क जरूर बजावावा, असे आवाहनही डॉ.गेडाम यांनी केले आहे.
यावेळी पाचही जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघात स्वीपच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
गृहभेट, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी ताई, महिला बचत गट आदीच्या माध्यमातून विभागात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. याशिवाय, सोशल मीडिया, एफ.एम रेडिओ, बस स्थानके याठिकाणीही जिंगल्स द्वारे मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात वाहनाच्या पीयूसी तपासणी दरात शासनाकडून वाढ, नवे दर जाहीर!

राज्यातील मोटार वाहनांच्या वायू प्रदूषण तपासणीच्या दरात सुधारणा करण्यास शासनाने मंजुरी दिली.. पोलीस वार्ता, नाशिक | महाराष्ट्र स्टेट पीयूसी सेंटर ओनर्स असोसिएशन, ठाणे यांनी वाहनांच्या...

भगूर शहर परिसरातील महावितरण संबंधी समस्या सोडवून नागरिकांना चांगल्या सेवा देऊ -सहा.अभियंता सुरेश पाचंगे

भगूर येथील तक्रार निवारण्यासाठी स्वतंत्र महिला कर्मचारी सारीका पोरजे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. पोलीस वार्ता, देवळाली | पाऊस आणि येणाऱ्या आगामी सण व गणेशोत्सवाच्या...

राजापूर येथे ट्रान्सफॉर्मर फोडून 80 किलो वजनाच्या कॉपर कॉईलची चोरी; अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल!

चोरट्याने विद्युत पोलवरील 100 kv डीपीचा ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील 80 किलो वजनाची कॉपरची कॉईल चोरली.. पोलीस वार्ता, राजापूर | भोर तालुक्यातील राजापूर येथे शेतातील...

सहा पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल देवळाली कॅम्प येथे त्यांचा सत्कार!

पोलीस दलातील धाडसी व उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाने 'राष्ट्रपती पदक' देऊन केले सन्मानित.. पोलीस वार्ता, देवळाली | महाराष्ट्र पोलीस दलातील नाशिक शहर पोलीस गुन्हे शाखा...

कावड़ यात्रा में ऊमडा जन सैलाब

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के शाहपुर क्षेत्र के ग्राम पिपरी से खड़कोद तक निकली भव्य कावड़ यात्रा: गुप्तेश्वर महादेव मंदिर में पुजा-हवन के साथ संपन्न ​बुरहानपुर।...

error: Content is protected !!