Homeआरोग्यमहाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज!

महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज!

ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर मतदारांसाठी बजावण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेतला.

पोलीस वार्ता, ठाणे: महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 साठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. येत्या 20 नोव्हेंबर ला होणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर मतदारांसाठी बजावण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अशोक शिनगारे यांनी घेतला. केंद्रावर मतदारांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोई होऊ नये व मतदान शांततेत पार पडावे, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने व गांभीर्य लक्ष देवून काम करण्याचे निर्देश सर्वांना दिले.
ठाणे शहर महानगरपालिका हद्दीत 1 हजार 546 मतदान केंद्रे तर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत 1 हजार 261 मतदान केंद्रे, ठाणे ग्रामीण भागात 1 हजार 124 मतदान केंद्रे, नवी मुंबई महापालिका हद्दीत 831 मतदान केंद्रे, मीरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत 755 मतदान केंद्रे, भिवंडी महानगरपालिका हद्दीत 586 मतदान केंद्रे, उल्हासनगर महानगरपालिका 399 मतदान केंद्रे, तर सर्व नगरपालिका हद्दीत 453 मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रावर देण्यात येणार्‍या सोईसुविधांची जबाबदारी ही संबंधित महानगरपालिका, नगरपालिका यांची असून ग्रामीण भागातील मतदान केंद्राची जबाबदारी ही जिल्हा परिषदेकडे आहे. या सर्व मतदान केंद्राची पाहणी ही येथील आस्थापनातील अभियंत्यांनी प्रत्यक्ष जागेवर जावून पाहणी करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अशोक शिनगारे यांनी यावेळी दिले. तसेच एखाद्या मतदान केंद्रावर अडचण निर्माण होत असेल तर त्याची माहिती त्वरित कळवावी, त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात येईल, असेही जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नमूद केले. बैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, महापालिकांचे नगर अभियंता, तसेच ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्रावर सोईसुविधांसाठी कार्यरत असलेले अभियंते देखील उपस्थित होते.
यावेळी बैठकीत ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील बूथ व त्याठिकाणी करण्यात येणाऱ्या सुविधा या संदर्भात माहिती जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री.अशोक शिनगारे यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून अभियंत्यांकडून घेतली. तसेच विधानसभा मतदान केंद्राची पाहणी आपण स्वत: तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नियुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सर्वांना सांगितले.
  • मतदान केंद्रावर सुविधा पुरविण्याच्या सुचना!
महाराष्ट्रातील ठाणे जिल्हयातील सार्वत्रिक 18 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर..
  • मतदारांसाठी सूचना फलक,
  • दिशादर्शक,
  • दिव्यांगासाठी रॅम्पची सुविधा,
  • मतदार सहाय्य केंद्र,
  • पुरेशी व्यवस्था,
  • मंडप व्यवस्था,
  • पिण्याच्या पाण्याची सोय,
  • स्वच्छ स्वच्छतागृहे,
  • प्रतिक्षालय,
  • रांगेतील मतदारांसाठी खुर्च्यांची व्यवस्था,
  • तसेच मंडपात असलेल्या मतदान केंद्रानजीक मोबाईल टॉयलेटची व्यवस्था,
  • प्रथमोपचार सुविधा,
  • मतदान केंद्रावर पाळणाघर,
  • तसेच दिव्यांगासाठी व्हीलचेअरची सुविधा,
  • पार्टीशन मध्ये तयार करण्यात आलेल्या मतदान केंद्रावर लावण्यात येणार्‍या रांगांसाठी जागेची उपलब्धता.
आदी सर्व सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने संबंधित प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी नियोजन करावयाचे आहे.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील,ठाणे 📱संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट; दोशींच्या चौकशीची मागणी!

मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांचे कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण.. पोलीस वार्ता, पुणे : हडपसर परिसरात बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या मृत...

महाजनको रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला ब्लॅकमेलिंग करून पैशांची मागणी; अश्लील मेसेज पाठवल्याचाही आरोप?

सात ते आठ वर्षांपासून महिला कर्मचाऱ्याला ब्लॅकमेलिंग प्रकार सुरू असल्याचा दावा, महिलेला मोबाईलवर अश्लील संदेश पाठवण्यात आल्याची माहिती.. पोलीस वार्ता, भुसावळ : तालुक्यातील दिपनगर औष्णिक...

अन्न व औषध प्रशासनाच्या मोहीमेत 1 लाख 19 हजार रुपये किंमतीचा अन्नपदार्थ साठा जप्त!

अन्न नमुने विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक : अन्न व औषध प्रशानाकडून नागरिकांना...

जळगाव एसीबीची भुसावळात धडक कारवाई

0
बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षकासह खासगी पंटराविरोधात लाचखोरीचा गुन्हा भुसावळ - शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू सांगळे आणि त्यांचा खासगी पंटर सलीम हाकीम कुरेशी यांच्याविरुद्ध...

error: Content is protected !!