Homeक्राईमविवाहित महिलेचा खून प्रकरणातील संशयितांस  रेल्वे सुरक्षा बल विभागाने आठ तासात  घेतले...

विवाहित महिलेचा खून प्रकरणातील संशयितांस  रेल्वे सुरक्षा बल विभागाने आठ तासात  घेतले ताब्यात !

भुसावळ – शहरातील व्दारका नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळे मागे ता.२९ रोजी दुपारी दोन ते चार वाजेच्या सुमारास कौटुंबिक वादावरून एका विवाहित महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर संशयित महिलेचा पती अक्षय आप्पासाहेब गुंजाळ हा फरार झालेला होता.मुंबईला जाण्यासाठी कदाचित रेल्वे गाडीने प्रवास करीत असावा या अनुषंगाने रेल्वे सुरक्षा बल विभागाला माहिती कळविले असता शिताफीने मनमाड रेल्वे स्थानकावरून संशयितांस तांत्रिक विश्लेषणांच्या आधारे
आठ तासात ताब्यात घेण्यात आले.
दरम्यान गेले चार महिन्यांपूर्वी मुंबई येथे पती – पत्नीमध्ये कौटुंबिक वाद झाल्याने विवाहित महिला वर्षा अक्षय गुंजाळ ही आजी रंजना प्रकाश यशोदे राहणार व्दारका नगर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळे मागे यांच्यासोबत राहत होती.दोन दिवसांपासून अक्षय हा मुंबई वरून त्यांची पत्नी वर्षाला मुंबई घेऊन जाण्याचा भुसावळात नातेवाईकांकडे तळ ठोकून होता.राग सोडून मुंबईला चल असा हट्ट करीत होता मात्र वर्षाने कदाचित नकार दिल्याने अक्षयच्या राग विकोपाला गेल्याने २९ ऑक्टोबर रोजी आजी ही दुपारी चार वाजेच्या सुमारास बाजार करण्यासाठी गेली असता याचा फायदा घेत संशयित अक्षय आप्पासाहेब गुंजाळ याने घरात प्रवेश करून वर्षाच्या डोक्यात धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करून फरार झाला होता.घरामध्ये रक्ताचा सरोळ्यात वर्षा गुंजाळ ही पडून तिचा संशयास्पद मृत्यू झालेला होता.यासंदर्भात शहर पोलीस स्टेशन चे अधिकाऱ्यांनी रेल्वे सुरक्षा बल विभागाचे रिजर्व अधिकारी आर.के.सिंग व रेल्वे सुरक्षा बल विभागाचे निरीक्षक पी.आर.मीना यांच्याशी संपर्क साधला असता तात्काळ तांत्रिक विश्लेषणांच्या आधारे संशयित आरोपीचा शोध घेतला असता मनमाड येथे असल्याची माहिती मिळताच मनमाड रेल्वे सुरक्षा बल विभागाचे सब इन्स्पेक्टर दीपक गायकवाड यांनी रेल्वे स्थानकावर फरार आरोपीचा शोघ घेतला असता संशयित आरोपी अक्षय गुंजाळ हा रेल्वे स्थानकावर रात्री अकरा वाजेच्या दरम्यान झोपलेला मिळून आला. तात्काळ त्यास ताब्यात घेण्यात आले व सदरील माहिती रेल्वे सुरक्षा बल विभागाचे निरीक्षक पी.आर.मीना व शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक उद्धव डमाळे यांना कळविली.रात्रीच पथकास मनमाड येथे पाचारण करून संशयित आरोपीस ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून संशयितास भुसावळ शहर पोलिसांना सुपूर्त करण्यात आले.
सदरील घटनेची फिर्याद रंजनाबाई प्रकाश यशोदे (वय.६२) यांनी दिल्यावरून शहर पोलीस ता.३० रोज स्टेशनला गुरन २४३/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३,३५२,३५१(३) प्रमाणे गुन्हा करण्यात आला आहे.गुन्ह्याचा अधिक तपास शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक उद्धव डमाळे करीत आहे.
सदरील गुन्ह्यातील संशयित आरोपीचा शोध घेण्याकामी रेल्वे सुरक्षा बल विभागाचे रिजर्व अधिकारी आर.के.सिंग यांचे अनमोल सहकार्य मिळाले.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर भुसावळ नगर परिषदेत विशेष आढावा बैठक

0
भुसावळ : नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सोनू सारवान यांच्या उपस्थितीत विशेष आढावा बैठक घेण्यात...

अमरदीप चौकातून बेपत्ता सहा वर्षीय बालकाचा लिफ्टच्या खड्ड्यात मृतदेह

0
सकाळपासून शोध सुरू असलेल्या अदनान खानचा रात्री मृतदेह आढळला; बांधकामस्थळी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर भुसावळ  : (निलेश फिरके) अमरदीप चौक परिसरातून बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या सहा...

भगूर नगरपरिषदेच्या बॅनर कारवाई वरून राजकारण तापले; शिवसेनेकडून दुजाभावाचा आरोप

0
नियम सर्वांसाठी समान असतील तर अंमलबजावणी ही समान झाली पाहिजे. आम्ही लोकशाही मार्गाने लढा देऊ.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेने शहरातील अनधिकृत परवाना नसलेले...

महावितरणाकडून भगूर येथे ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ निमित्त विजेची सुरक्षा व हरित ऊर्जा यावर प्रबोधन...

0
विजेच्या गरजेबाबत शिक्षक व मुलांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी. म्हणून कार्यक्रम राबविण्यात आला.. पोलीस वार्ता, देवळाली | 2026 'राष्ट्रीय अभियंता दिन' निमित्त महावितरण भगूर कक्षाकडून वीज...

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

error: Content is protected !!