भुसावळ – शहरातील गौसिया नगर परिसरात उभ्या असलेल्या तीन मालवाहतूक रिक्षांमधील बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ता.१ रोजी रात्री नऊ ते २ तारखेला सकाळी पाच वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालवाहतूक क्रमांक एम.एच.१९ सी.डब्ल्यू.४०६८ तसेच शेख रशीद शेख हमीद यांच्या रिक्षा क्रमांक एम.एच.०२ सी.ई.२९३८ आणि शेख फरीद शेख रसूल यांच्या मालकीच्या एम.एच.१९ बी.एम.५३६१ या रिक्षांमधील बॅटऱ्या अज्ञात चोरट्याने लबाडीच्या उद्देशाने चोरून नेल्या. या चोरीत एकूण १४ हजार ८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी शेख आबीद शेख खलील पिंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

























