रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे यांना अटक शिवशंभु प्रिया जांभळे आक्रमक..

पोलीस वार्ता, संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला विषय औरंगजेबाची कबर काढण्या यावी अशी सर्व शिवभक्तची इच्छा आहे. हे प्रकरण गाजत असताना रुद्र धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील हे सकाळी पाचच्या सुमारास मंत्रालयावरून येत असताना छत्रपती संभाजी नगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेले आहे.
स्वराज्य रक्षक छत्रपतींची शिवशंभूकार्य करणे जर तुमच्या नजरेत गुन्हा असेल तर घ्या ताब्यात किती जणांना घेता विषय छत्रपतींचा असेल तर तुमचे तुरुग कमी पडतील एवढं लक्षात असू द्या असे जांभळे यांनी नुकतेच आपले मत दिले आहे. प्रशासनाने तात्काळ बाळराजे आवळे पाटील यांना मुक्त करावे अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण देशांमध्ये आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला. पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करत पोलिसांनी जर यावर लक्ष लक्ष दिले नाही तर जिल्हा बंद करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला.




































