Homeक्राईमशासकीय नोकरीचे अमिष दाखविणारे पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शासकीय नोकरीचे अमिष दाखविणारे पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ – शहरातील गडकरी नगर,करूनेश्वर महादेव मंदिर जवळील संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने रुक्मिणी फाउंडेशन मार्फत शासनाच्या विविध विभागात शासन सेवक म्हणून नोकरीस लावून देण्याचे अमिष देवून अनेकांची आथिर्क फसवणूक केल्याप्रकरणी प्रशांत अग्रवाल सह चार साथीदारांविरुद्ध पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली तर गुन्ह्यातील तीन संशयित फरारी आहे.प्रशांत अग्रवाल व योगेश तिवारी असे संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी वसंत जानबाजी ढोणे सेवानिवृत्त लोहमार्ग पोलीस कर्मचारी राहणार मुरलीधर सोसायटी घर नंबर १६ जुना तोल नाका,टाटा मोटर्स,फेकरी यांचे मुलास नोकरीस लावून देण्याचे उद्देशाने पैसे घेवून फसवणूक केल्याने संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल यांच्या विरुद्ध ता २१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदरील संशयितास न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी खाकी दाखवितात संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल याने विजयकांता सुरेंद्र मुनोद ऊर्फे मेहता मॅडम राहणार पन्नाभवन, वरणगांव रोड गो गॅस पंपाचे शेजारी, शिवाजी नगर,योगेश केशव प्रसाद तिवारी राहणार रिंग रोड फालक नगर गणेश मंदिर जवळ भुसावळ, मुन्ना मोहन परदेशी राहणार फिल्टर हाऊस रोड कवाडे नगर भुसावळ, मेघराज सिंग नारायण सिंग पाटील राहणार साकरी तालुका भुसावळ अशांनी नावे सांगितली.
पोलिसांनी संशयित आरोपी प्रशांत अग्रवाल यास ता.२१ रोजी अटक करून न्यायालयात हजर केले असता ता.२५ पावेतो पोलीस कोठडी सुनावली होती.कोठडी संपल्याने
पोलिसांनी संशयित आरोपी अग्रवाल यास ता.२५ रोजी न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडीत वाढ झाली आहे.तर महिला बाल संगोपन केंद्राचे लीडर संशयित आरोपी योगेश केशव प्रसाद तिवारी यास ता.२५ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अटक केली असून गुन्ह्यातील  उर्वरित तिघे संशयित आरोपी फरारी आहे.गुन्ह्याचा अधिक तपास पो उप निरीक्षण मंगेश बेंडकोळी सह योगेश महाजन,जीवन कापडे करीत आहे. आद्यपावतो २५,६८,४०६ रुपये संशयित आरोपींकडून पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले आहे.या प्रकरणी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.जळगांव,नंदुरबार,बुलढाणा येथील अनेकांची आर्थिक फसवणूक केल्याची माहिती तपास अधिकारी यांनी दिली.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डंपरच्या चाकाखाली चिरडून मजुराचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील सुनसगाव येथे सुदर्शन पेपर अँड प्रॉडक्ट्ससमोर रेतीने भरलेल्या डंपरच्या चाकाखाली चिरडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ जून रोजी पहाटे...

उतुंग यश: पोलीस कर्मचाऱ्याच्या सुपुत्रांचा पोलीस अधिक्षकांकडून गौरव

0
:जळगाव - येथील  पोलीस दलात कार्यरत असलेले किशोर लक्ष्मण सोनटक्के यांचे सुपुत्र विकास किशोर सोनटक्के यांनी १२ वी विज्ञान (Science) शाखेच्या परीक्षेत ८०% गुण...

जामनेरमध्ये बेकायदेशीर HTBT कापूस बियाण्यांवर धाड ; ९.१५ लाखांचा साठा जप्त, चौघांविरुद्ध गुन्हा

0
जामनेर, प्रतिनिधी : जळगाव जिल्ह्यात प्रतिबंधित व बेकायदेशीर HTBT (हर्बिसाइड टॉलरंट बीटी) कापूस बियाण्यांच्या साठवणूक व विक्रीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत जामनेर पोलिसांना मोठे...

मोर धरण परिसरातील शासकीय जमीन तात्काळ रिकामी करण्याचे आदेश

0
भुसावल - मोर धरणालगत हिंगोणे व बोरखेडा बुद्रुक ता .यावल परिसरातील शासकीय जमिनीवर अनधिकृतपणे शेती करणाऱ्या अथवा ताबा घेतलेल्या शेतकऱ्यांनी तात्काळ जमीन रिकामी करावी,...

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

error: Content is protected !!