भोर / प्रतिनिधी – संतोष मोहिते
भोर तालुक्यातील कापूरहोळ गावचा होतकरू युवक, उद्योजक आणि उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून ओळख असलेले विनायक देवघरे उर्फ ‘गोपी’ यांचे वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने कापूरहोळ गावासह संपूर्ण भोर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
क्रिकेट क्षेत्रात हुकमी वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या अचूक आणि धारदार गोलंदाजीमुळे स्थानिक स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक सामने जिंकून दिले होते. मराठी माध्यमातून बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी व्यवसाय क्षेत्रातही यशस्वी वाटचाल करत आपले स्थान निर्माण केले होते.
विनायक देवघरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मोठे बंधू ह.भ.प. प्रवीण नवनाथ देवघरे, वहिनी, मोठी बहीण तसेच आई-वडील असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाने क्रीडा व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात असून, “ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व दुःखद प्रसंगात परिवाराला धैर्य मिळो,” अशी भावपूर्ण श्रद्धांजली सर्वत्र व्यक्त होत आहे.


































