Homeक्राईमसावदा दुध संस्थेत विदेशी दारू साठा; पोलिसांची छापा कारवाई

सावदा दुध संस्थेत विदेशी दारू साठा; पोलिसांची छापा कारवाई

रावेर (साजित शेख) तालुक्यातील सावदा शहरात सहकारी दुध उत्पादक संस्थेमध्ये विदेशी दारूची बेकायदेशीर साठवण आणि विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सावदा पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली.

दि. २५ मार्च २०२६ रोजी सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, शहरातील सहकारी दुध संस्थेमध्ये एका व्यक्तीने विदेशी दारू विक्रीसाठी साठवून ठेवली आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. दुध डेअरीच्या किचन रूममध्ये तपासणी केली असता एका बॉक्समध्ये ७५० एमएलच्या ९ सिलबंद विदेशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या बाटल्यांची एकूण किंमत सुमारे १३ हजार ५०० रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी संस्थेतील क्लर्क नितीन रामकृष्ण बेंडाळे (वय ४६, रा. सावदा) याने दारू विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याविरोधात सावदा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास पोहेकॉ उमेश पाटील हे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करीत असून, या बेकायदेशीर कारवाईमध्ये संस्थेच्या संचालक मंडळाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोउनि अमोल गर्जे, पोहेकॉ उमेश पाटील, पोना जाकीर मन्सुरी आणि पोकॉ मयुर पाटील यांच्या पथकाने केली. या घटनेमुळे सावदा परिसरात खळबळ उडाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात 14 मे मध्यरात्रीपासून 28 मे रात्रीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी!

नाशिक शहर कार्यक्षेत्रात 14 मे 2026 रोजी मध्यरात्रीपासून ते 28 मे 2026 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश.. पोलीस वार्ता, नाशिक : शहर...

सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी ‘बोधचिन्हाचे’ सह्याद्री अतिथीगृह येथे अनावरण!

कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सुमारे तीन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.. पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027...

हिंगोली येथे चौथा सर्वधर्मिय विवाह सोहळा संपन्न..

0
हिंगोली (मीनाक्षी पोळ)  येथे आज दिनांक12 मे 2026 रोजी शहरातील हिंगोली नगरपालिकेच्या कल्याण मंडपम् येथे संबोधी ॲकडमी महाराष्ट्र, सरस्वती महिला सेवाभावी संस्था व हिंगोली...

पत्रकाराच्या आंदोलनाला मोठे यश; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर अखेर गुन्हा दाखल!

सुरुवातीला अदखलपात्र गुन्ह्याची नोंद, आंदोलनानंतर राजगड पोलिसांनी गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.. पोलीस वार्ता, पुणे : भोर तालुक्यातील कापूरहोळ येथे पत्रकारावर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी...

पत्रकारावर हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयात जाळीत उडी ; राम पाचकाळे यांचे अनोखे आंदोलन

0
पुणे : पत्रकारितेचे काम करत असताना मारहाण, दमदाटी व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी FIR दाखल करण्याच्या मागणीसाठी पत्रकार राम शिवाजी पाचकाळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय,...

error: Content is protected !!