Homeक्राईमभुसावळ रेल्वे स्थानकावर गुटखा जप्त; पाचोऱ्यातील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ रेल्वे स्थानकावर गुटखा जप्त; पाचोऱ्यातील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

भुसावळ – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एका तरुणाकडून भुसावळ रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात सुगंधित पानमसाला व गुटखा जप्त करण्यात आला. कर्नाटक एक्सप्रेसमधून अनधिकृतरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली.

लोहमार्ग पोलीस निरीक्षक सुधीर घायरकर यांना पाचोरा येथील एक तरुण बऱ्हाणपूरहून कर्नाटक एक्सप्रेसने गुटखा घेऊन पाचोराकडे जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी जय कोळी, धनराज लुले, विलास जाधव आणि अंकुश लांडगे यांच्या पथकाने भुसावळ रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर गाडीची तपासणी केली.

तपासणीदरम्यान कर्नाटक एक्सप्रेसच्या दिव्यांग डब्यात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका तरुणाची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून १७ हजार ११२ रुपयांचा सुगंधित पानमसाला तसेच त्यासोबत मिश्रित करण्यात येणारी सुगंधित तंबाखू (गुटखा) मोठ्या प्रमाणात आढळून आली. पोलिसांनी तत्काळ संबंधित मुद्देमाल जप्त करून तरुणाला ताब्यात घेतले.

या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेल्या गुटख्याची किंमत, वाहतुकीचे उद्दिष्ट आणि त्यामागील साखळीचा तपास लोहमार्ग पोलीस करीत आहेत. रेल्वेमार्गे होणाऱ्या अवैध गुटखा वाहतुकीविरोधात लोहमार्ग पोलिसांची कारवाई सुरू असून अशा प्रकारांवर कडक लक्ष ठेवण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्नाटक एक्स्प्रेसमधून ६० हजारांचा पानमसाला जप्त

0
(भुसावळ लोहमार्ग पोलीस व आरपीएफची संयुक्त कारवाई; खंडव्याच्या प्रवाशाला ताब्यात घेतले) भुसावळ  (निलेश.के,फिरके). कर्नाटक एक्स्प्रेसमधून वाहतूक करण्यात येत असलेला ६० हजार २८० रुपये किमतीचा सुगंधित पानमसाला...

भुसावळात बोगस डॉक्टरवर कारवाई

0
जनसेवा क्लिनिकवर पोलिसांची छापा कारवाई ; विविध इंजेक्शन्ससह औषधसाठा जप्त भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील प्रीमियर हॉटेलसमोरील जनसेवा क्लिनिकमध्ये कोणतीही वैद्यकीय नोंदणी अथवा आवश्यक वैद्यकीय...

कराड उत्तरमध्ये महिलांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

0
बांधकाम कामगारांना साहित्य वाटप; महिलांना संसारोपयोगी वस्तूंचे वितरण कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील विविध भागांतील महिलांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गटात) जाहीर पक्षप्रवेश केला. यावेळी...

अगस्त क्रांति दिवस

0
रमाकांत मोरे । अगस्त माह भारत के स्वतंत्रता इतिहास में एक विशेष महत्व रखता है। 9 अगस्त 1925 को उत्तरप्रदेश के प्रमुख शहर लखनऊ...

गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में विशेष गोष्ठी सफलतापूर्वक संपन्न

0
​बुरहानपुर | परम वंदनीय माता जी एवं अखण्ड दीप के शताब्दी वर्ष के उपलक्ष्य में गायत्री परिवार बुरहानपुर द्वारा एक विशेष गोष्ठी का आयोजन...

error: Content is protected !!