भुसावळ : शहरातील सरस्वती नगर मित्र मंडळात गेल्या २१ वर्षांपासून श्री गणेशाची विधिवत स्थापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मंडळात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. तसेच रक्तदान शिबिर आणि नागरिकांमध्ये जनजागृती करणारे उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली जात आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष महेश नारडे, अशोक वाघोडकर, प्रमोद साळुंखे, शिरीष चौधरी, प्रमोद पेंदाम, संदीप श्रीवास्तव, आदिनाथ तेलंगडे, संदीप वाघोडकर, मनोज चंदन आदींनी परिश्रम घेतले.

























