Homeमहत्त्वाचेमुक्ताईनगर तालुक्यात कुंटणखान्यांचा सुळसुळाट; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

मुक्ताईनगर तालुक्यात कुंटणखान्यांचा सुळसुळाट; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

चिखली शिवारातील ढाबे-हॉटेलांवर खुलेआम वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा आरोप

मुक्ताईनगर (धनराज) : मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली शिवार परिसरात कुंटणखाने (वेश्याव्यवसाय) खुलेआम सुरू असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून केला जात आहे. ढाबे व हॉटेलांच्या आडून हा अनैतिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असून, संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष किंवा आश्रय असल्याशिवाय हे शक्य नसल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

नियमानुसार वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची दर महिन्याला आरोग्य तपासणी करणे बंधनकारक असते. मात्र चिखली शिवारातील कथित कुंटणखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिला बाहेरून आणल्या जात असून, त्यांच्याकडे कोणतेही अधिकृत आरोग्य तपासणी प्रमाणपत्र नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे एचआयव्ही तसेच इतर गुप्त आजारांचा धोका वाढत असून, समाजाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या पार्श्वभूमीवर वेश्या गमन करणाऱ्या व्यक्तींमध्ये संसर्गजन्य आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून, अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त झाल्याचेही सांगितले जात आहे. तसेच रात्री अपरात्री हॉटेल्स व ढाब्यांवर जाणाऱ्या लोकांमुळे रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असून, काहींना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या सर्व प्रकारांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. कुंटणखाने तात्काळ बंद करण्यात यावेत, संबंधित ढाबे-हॉटेलांवर कठोर कारवाई करावी तसेच आरोग्य व पोलिस यंत्रणांनी संयुक्तपणे तपास मोहीम राबवावी, अशी ठाम मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.या व्यश्याव्यवसायामुळे गावाचे नाव खराब होत आहे तसेच  गावाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलत असून लोक गावाकडे संशयाच्या नजरेने पाहत आहेत.

शासन व प्रशासनाने या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीची पावले उचलावीत, अन्यथा सामाजिक व आरोग्यविषयक प्रश्न अधिक गंभीर स्वरूप धारण करतील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्यात ढगाळ हवामान, मेघगर्जनेसह वादळी पाऊस, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कता इशारा!

संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ते प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन.. पोलीस वार्ता, मुंबई : राज्यात पश्चिम भागात, घाट परिसर, खानदेश, मराठवाडा...

सोशल मीडियावर कोणतीही अफवा शेअर करताना खबरदारी बाळगावी -नाशिक पोलीस!

महिला छळ प्रकरणात पोलिसांनी तात्काळ व कठोर कारवाई केली असून नागरिक, माध्यमांकडून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल पोलिसांनी आभार व्यक्त केले.. पोलीस वार्ता, नाशिक : शहरात घडलेल्या एका...

बैंक सुरक्षा को लेकर बुरहानपुर पुलिस अलर्ट

0
बुरहानपुर पुलिस द्वारा जिले में बैंकों की सुरक्षा व्यवस्था का निरीक्षण बैंक सुरक्षा चेकिंग को लेकर थाना प्रभारियों एवं स्टाफ ने किया व्यापक निरीक्षण दिनांक 18.04.2026...

“बुरहानपुर पुलिस का अनोखा अभियान

0
‘सृजन, सम्मान और अभिमन्यु’ से बालिकाओं को बनाया सशक्त” बुरहानपुर, 18 अप्रैल 2026 (प्रेस नोट): महिलाओं एवं बालिकाओं की सुरक्षा और सशक्तिकरण के उद्देश्य से बुरहानपुर...

जल गंगा संवर्धन अभियान

0
प्रभारी मंत्री श्री सिलावट ने किया हसनपुरा तालाब गहरीकरण कार्य का शुभारंभ प्रभारी मंत्री श्री तुलसीराम सिलावट ने ग्रामीणजनों के बीच बैठकर किया संवाद बुरहानपुर/18 अप्रैल,...

error: Content is protected !!