Homeआरोग्यविदर्भा नदीच्या प्रवाहात टाटा मॅजिक वाहन गेले वाहून, चालकाचा मृत्यू तर एक...

विदर्भा नदीच्या प्रवाहात टाटा मॅजिक वाहन गेले वाहून, चालकाचा मृत्यू तर एक बचावला..

नदीचा पूल ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात वाहन वाहून गेले असल्याची घटना 27 मे ला रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. यावेळी वाहनात दोन जण होते..

पोलीस वार्ता, (यवतमाळ) झरी : मान्सूनची राज्यात सुरुवात झाली असून झरी तालुक्यात मागील काही दिवसांपासून संततधार व मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरले भरून वाहू लागले आहेत. त्यातच मंगळवारी दि.27 मे रोजी झालेल्या जोरदार पाऊसाने विदर्भा नदीच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाली. नदीने धोक्याची पातळी गाठली, त्यामुळे कोसारा घाटातील पुलावरून पुराचे पाणी वाहू लागले, याच दरम्यान झरी तालुक्यातील डोंगरगाव येथील प्रवासी वाहनाचे भाडे मारून उमरीकडे परतत असताना त्यांचे टाटा मॅजिक वाहन नदीचा पूल ओलांडताना पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले असल्याची घटना 27 मे ला रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. यावेळी वाहनात दोन जण होते. या अपघातात एक बचावला तर, चालक रामा कनाके, वय-55 वर्षे, रा. उमरी यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.

नदीच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्याचा अंदाज चालकाला न आल्याने ही घटना घडली आहे. पुलावरून पाणी वाहत असतांना चालकाने नदीचा ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या प्रवाह प्रचंड असल्याने टाटा मॅजिक वाहन प्रवाहासोबत वाहून गेले. वाहन नदीत वाहून जात असतांनाच चालकाच्या बाजूच्या सीटवर बसून असलेल्या भास्कर कुसाम, वय-50 वर्षे यांनी वाहनातून उडी मारली. त्यामुळे त्याचा जीव वाचला. तर वाहन चालक रामा कनाके याला बाहेर पडणे शक्य न झाल्याने त्याचा नदीत बुडून मृत्यू झाला. विदर्भा नदीला पूर आल्याने गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात नदीच्या पुलाजवळ जमा झाले होते. अशातच नदीच्या पुलावरून वाहन वाहून जात असल्याचे दिसताच उपस्थितांपैकी काही लोकांनी पोलिसांना 112 वर फोन केला. शिरपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहचले. पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने नदीत वाहून जाणाऱ्या एकाला वाचवण्यात आले. रात्री उशिरापर्यंत नदी पात्रात शोध मोहीम चालू होती. पहाटे 3 वाजता पुरात वाहून गेलेले वाहन आणि चालक रामा कनाके यांचा मृतदेह नदी बाहेर काढला गेला. त्यानंतर तो शवविच्छेदना करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला गेला. मृत कनाके यांनी तीन महिन्यांपूर्वीच टाटा मॅजिक वाहन खरेदी केले होते. प्रवासी भाड्यावर ते वाहन चालवत होते, रामा कनाके याच्या पश्चात पत्नी व तिन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी : प्रशांत जुमणाके, झरी यवतमाळ, संपर्क: 09921613563
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!