भुसावळ – शहरातील होंडा शोरूम मध्ये काम करणारा अण्णाभाऊ साठे नगर येथील कर्मचाऱ्याने विना नंबर होंडा शाईन कंपनीची १,०२,००० रुपये किंमतीची मोटरसायकल होंडा शोरूम मधून चोरून घेऊन गेल्याची घटना ता.२ रोजी घडली.संशयित नाव रत्नेश पुरुषोत्तम रोडे असे आहे.याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशानुसार पथकातील श्रेणी पो.उप.नि. रवी नरवाडे,गोपाल गव्हाळे,उमाकांत पाटील,विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे अशांनी संशयित रत्नेश पुरुषोत्तम रोडे,राहणार अण्णाभाऊ साठे नगर भुसावळ हा विना नंबर शाईन कंपनीची मोटरसायकल सह मिळून आला. त्यास विचारपूस केली असता सदरची मो.सा. ही तो काम करीत असलेल्या होंडा शोरूम मधून चोरून घेऊन गेल्याची कबुली दिली.त्यावरून फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ता.२ रोजी गुन्हा दाखल केला आहे.


























