Homeआरोग्यनोव्हेंबर महिन्यातही महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे..

नोव्हेंबर महिन्यातही महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा जोर कायम आहे..

विदर्भ, मराठवाडा, मुंबई व कोकणमध्ये रविवारी हलका ते मध्यम पाऊस होता, राज्यात सोमवारी देखील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे..

पोलीस वार्ता, मुंबई : देशात नोव्हेंबर महिना चालू झाला असला तरी महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असल्याचे दिसत आहे. सोमवारी 3 नोव्हेंबर रोजी राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचे सावट असण्याची शक्यता वर्तवली आहे, ज्यात पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला असून महाराष्ट्रात मे महिन्यापासून सुरु असलेला पाऊस नोव्हेंबरमध्येही थांबतांना दिसत नाही. विदर्भ, मराठवाडा, मुंबई व कोकणमध्ये रविवारी हलका ते मध्यम पाऊस होता, राज्यात सोमवारी देखील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. अंदाजानुसार, पुढील 5 नोव्हेंबरपर्यंत हवामानाची हीच परिस्थिती राहणार आहे.
1) मुंबई शहर आणि उपनगरात सोमवारी ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील असे कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार सांगितले आहे. कमाल तापमान 31°C आणि किमान 24°C राहण्याची अपेक्षा आहे. कोकणातील इतर भागात देखील अशीच स्थिती राहील.
2) पुणे, सांगली आणि सोलापूर या भागात विजांचा कडकडाट आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच सोलापूरसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
3) नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहील.
4) धाराशिव, लातूर आणि बीडमध्ये विजांसह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात 30–40 किमी वेगाने वारे वाहू शकतात. छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, हिंगोली व नांदेडमध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
5) विदर्भात ढगाळ वातावरण राहणार असून, तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलकी सरी वगळता, विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज नाही.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ओव्हरलोड राख भरण्यावरून वाद ; धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल

0
भुसावळ - तालुक्यातील दिपनगर परिसरात ओव्हरलोड राख भरण्याच्या वादातून शिवीगाळ, धमकी व मारहाणीची घटना घडल्याची तक्रार भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे....

भुसावळात भट्टीजवळ उभी रिक्षा पेटली; मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली

0
भुसावळ - शहरातील जामनेर रोडवरील शेठ घासीलाल अँड सन्स या दुकानासमोर उभी असलेली रिक्षा अचानक पेट घेतल्याची घटना घडली. या आगीत रिक्षेचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

भुसावळात ‘अमृत’ योजनेचा घोटाळा? नगराध्यक्षांचा संताप उसळला ; ठेकेदारांवर कारवाईची मागणी

0
८-१० वर्षे रखडलेली पाणी योजना , खर्च ९० कोटींवरून १३५ कोटींवर; नागरिकांना पाण्यासाठी हाल भुसावळ : शहरातील पाणीपुरवठा आणि विकासकामांच्या रखडलेल्या प्रश्नांवरून भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री...

मुहकीं देखभाल बच्चोंके संपूर्ण स्वास्थ्य के लिए बेहद जरूरी है।

0
इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस, बरेली के विशेषज्ञों का मानना है कि यदि शुरुआत से ही बच्चों के मुंह की सफाई पर ध्यान दिया जाए,...

बुरहानपूर: पशुओं के लिए पानी की हौज की व्यवस्था,सामाजिक पहल

0
बुरहानपुर में भीषण गर्मी को देखते हुए एक सराहनीय सामाजिक पहल की गई है। जायंट्स वेलफेयर फाउंडेशन अंतर्गत जायंट्स ग्रुप ऑफ बुरहानपुर ‘सहेली’ द्वारा...

error: Content is protected !!