Homeक्राईमभुसावळात बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

भुसावळात बांगलादेशी महिलेचा पर्दाफाश

बनावट कागदपत्रांच्या आधारे तब्बल १७ वर्षे वास्तव ;विदेशी व्यक्ती अधिनियम’ अंतर्गत गुन्हा

भुसावळ : शहरात बनावट ओळख व कागदपत्रांच्या आधारे तब्बल १७ वर्षांपासून वास्तव करणाऱ्या एका बांगलादेशी महिलेचा भुसावळ पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून संबंधित महिलेविरुद्ध परदेशी नागरिक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तिच्याकडून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड,बँक पासबुक तसेच भारतीय पासपोर्टसह विविध कागदपत्रे जप्त केली आहेत.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १९ मे रोजी भुसावळ शहर पोलिसांनी संशयित महिलेला ताब्यात घेतले.पुढील चौकशीसाठी तिला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सुरुवातीला तिने स्वतःचे नाव जस्मिन बी मोहम्मद खान असे सांगितले. मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केल्यानंतर तिचे खरे नाव फरीदा बेगम मोहम्मद खान असल्याचे निष्पन्न झाले. ती मूळची बांगलादेशातील पीरोजपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याची कबुली तिने दिली.

तपासादरम्यान आरोपी महिला सन २००९ मध्ये दलालाच्या मदतीने बांगलादेशातून भारतात आल्याचे समोर आले. नदीमार्गे बेकायदेशीररीत्या सीमा ओलांडून ती प्रथम पश्चिम बंगालमध्ये पोहोचली. त्यानंतर रेल्वेने भुसावळ येथे येऊन ती वास्तव्यास राहू लागली. गेल्या अनेक वर्षांपासून ती स्थानिक पातळीवर भारतीय नागरिक म्हणून वावरत असल्याचेही उघड झाले आहे.

पोलिसांनी तिच्या ताब्यातून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पॅन कार्ड, बँक पासबुक आणि भारतीय पासपोर्ट अशी महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. ही कागदपत्रे बनावट अथवा चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात अधिक तपास सुरू असून संबंधित कागदपत्रांची शासकीय पडताळणी केली जात आहे.

दरम्यान, आरोपीच्या मोबाईल फोनच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. IMO अॅपच्या माध्यमातून ती बांगलादेशातील +८८० देशकोड असलेल्या मोबाईल नंबरशी नियमित संपर्कात असल्याचे आढळले. व्हिडिओ कॉल आणि चॅटिंगचे पुरावेही पोलिसांना मिळाले आहेत. तसेच मोबाईलमध्ये बांगलादेशातील जन्मदाखल्याची माहिती सापडल्याने तिची खरी ओळख उघडकीस आली.

पोलिस तपासात आरोपीची बहीण पूर्वीपासून भुसावळमध्ये राहत असल्याचेही समोर आले आहे. तिच्याच मदतीने आरोपीने स्थानिक कागदपत्रे तयार करून भारतीय ओळख निर्माण केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, बहिणीचा आणि तिच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे.

या प्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध ‘विदेशी व्यक्ती अधिनियम’ कलम २१,२२ व २३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून बेकायदेशीर प्रवेश आणि वास्तवाबाबत कठोर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख करीत आहेत.

सदरील बांगलादेशी महिलेस (रेल्वे कोर्ट) लोहमार्ग न्यायालयात हजर केले असता मा. न्यायाधीश मो. शारीक उता उर रहेमान यांनी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

या घटनेमुळे भुसावळ शहरात सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून बेकायदेशीररीत्या वास्तव करणाऱ्या परदेशी नागरिकांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चापोरा में अज्ञात जानवर ने तीन पशुओं का कीया शिकार पशुओं की हुई मौत

0
बुरहानपुर (सुरज दहे) जिले से 18 किलोमीटर दुरी पर ग्राम चापोरा के युवा किसान महेंद्र गुलाबराव दहे के घर के पास पशुओं के बाडे में...

भुसावळात तरुणास मारहाण; ११ ते १३ जणांविरुद्ध गुन्हा

0
भुसावळ : शहरातील वाल्मीक नगर येथील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाला १० ते १२ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी सुमारे...

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

error: Content is protected !!