Homeक्राईममुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाइपने मारले; भुसावळात खळबळ

मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाइपने मारले; भुसावळात खळबळ

भुसावळ – शहरातील वाल्मीक नगर परिसरात कौटुंबिक वादातून मुलानेच वडिलांवर लोखंडी पाइपने हल्ला केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. १९) दुपारी घडली. या प्रकरणी आईनेच मुलाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून जखमी वडिलांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत हेमलता गोपाल निदाने (वय ४८, रा. वाल्मीक नगर, ३ नंबर पोलीस चौकीसमोर, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती गोपाल राजू निदाने हे नगरपालिकेच्या कचरा गाडीवर काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ते नाश्ता घेण्यासाठी घराजवळील लकी किराणा दुकानाकडे पायी जात होते.

त्यावेळी त्यांचा मुलगा निलेश गोपाल निदाने (वय २४) हा घरातून लोखंडी पाइप घेऊन त्यांच्या मागोमाग गेला. संशय आल्याने हेमलता निदाने या देखील मुलाच्या मागे गेल्या. लकी किराणा दुकानाजवळ पोहोचताच निलेश याने कोणतेही कारण नसताना वडील गोपाल निदाने यांच्या डोक्यात लोखंडी पाइपने जोरदार वार केला. तसेच चापटाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

मारहाणीवेळी गोपाल निदाने यांनी “तु मला का मारत आहेस?” असा जाब विचारला असता, “मी तुला आणि माझ्या आईला जिवे मारून टाकेन,” अशी धमकी देत आरोपी तेथून पसार झाला.

हल्ल्यात गोपाल निदाने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून रक्तस्त्राव सुरू झाल्याने नातेवाईक राकेश भारत डागोर यांनी रिक्षाने त्यांना गोल्डन अवर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलीस ॲक्शन मोडवर ; सराईत गुन्हेगार ताब्यात !

0
भुसावळ पोलीस उपविभाग व RPF ॲक्शन मोडमध्ये असून उपविभागात संयुक्त 'कॉम्बिंग ऑपरेशन' राबवून ६० हून अधिक संशयितांची झाडाझडती, सराईत गुन्हेगारांना घेतले ताब्यात आहे. भुसावळ शहरात...

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

error: Content is protected !!