भुसावळ दि-27/11/25, (निलेश फिरके) नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली असून प्रभाग क्रमांक १० मधील उमेदवार रामदास सावकारे यांच्या प्रचारासाठी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार गायत्री चेतन भंगाळे यांनी आज या प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांचा आर्शिवाद घेतला आहे.

याप्रसंगी प्रभाग क्रमांक १० मधील महिला व पुरुषांसह शेकडो मतदारांचा मोठा जनसमुदाय प्रचार मिरवणुकीत सहभागी होता. यामुळे प्रभागात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. उमेदवार रामदास सावकारे यांना या प्रभागातील मतदारांकडून प्रचारा दरम्यान उदंड प्रतिसाद मिळालेला आहे.ते पाहता त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.




































