Homeशिक्षण-प्रशिक्षणभुसावळ पालिका शाळेच्या आहारात आढळले मृत धनोर 

भुसावळ पालिका शाळेच्या आहारात आढळले मृत धनोर 

भुसावळ – शहरातील जामनेर रोडवरील न.पा.शाळा क्रमांक ३५ मध्ये विद्यार्थ्यांना आहार पुरवण्यात आलेल्या सोयाबीन बड़ी पुलावाच्या सोयाबीन बड्‌यांमध्ये धनोर (मृत) आढळून आल्याची घटना ता.१फेब्रुवारी रोजी घडली.
याबाबत माजी नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांनी फोन वरून पालिका मुख्याधिकारी यांना कळविले की,न.पा.शाळा क्रमांक ३५ या शाळेवर १ फेब्रुवारी रोजी पुरविण्यात आलेल्या सोयाबीन बड़ी पुलावाच्या सोयाबीन बड्‌यांमध्ये धनोर (मृत) आहेत.त्यावरून साडे बारा वाजेला पोषण आहार अधीक्षक यांनी सोयाबीन बडी पुलावाच्या सोयाबीन वड्यांची प्रत्यक्ष पाहणी केली असता सोयाबीन वड‌यांमध्ये धानोर (मृत) आढळून आलेत.
सदरील आहार विद्यार्थ्यांना खावू घातलेला नाही त्याबदल्यात विद्यार्थ्यांना वरण-बट्टी उपलब्ध करून देण्यात आली आहे. आहार पुरवठादार ललीत कोळी यांनी ते दवाखान्यात असल्याने येवू शकणार नाहीत असे कळविले.
प्रभारी नगरपालीका प्रशासन अधिकारी है रजेवर असल्याने पंचानाम्यासाठी उपस्थित राहू शकत नाही असे कळविले आहे,सदर प्रकाराबाबत मुख्याधिकारी नगरपालीका भुसावळ यांना कळविण्यात आले असुन पुढील कारवाईसाठी त्यांचेकडे प्रस्तावित करण्यात येईल.तक्रारदार महेंद्रसिंग ठाकूर यांनी या अगोदरही दोनदा पुरवठ्यातून यांना आहारात झुरळ व खिळा निघाल्याबाबत समज दिली आहे असे सांगितले.
लोकशाही महिला गृहउद्योग सह-सोसायटी संचलीत केंद्रीय स्वयंपाक गृह प्रणाली मार्फत आहार शाळेवर कामगार कैलास बडगुजर हे घेवून आले होते.उर्वरित शाळांवर हा आहार दिलेला नाही असे त्यांनी सांगितले.सदरील पंचनामा तक्रारदार कैलास बडगुजर,श्रीमती मनीषा तायडे,महेंद्रसिंग ठाकूर,योगेश सपकाळे, पंकज ठाकूर,हेमंत सोनवणे,यास्मिनबी सिकंदर
( मदत निस शालेय पोषण आहार),अजित तडवी( शापोआ अधिक्षक पंचायत समिती), गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे,जगदीश पाटील न.पा.शिक्षण मंडळ,हेमांगी पाटील न.पा.उप.शी.शाळा क्रमांक ३५,जयश्री ठोसरे  न.पा. उप.शी. शाळा क्रमांक ३५ भुसावळ यांच्या समक्ष करण्यात आला. सदरील पंचनामा सोमवार ३ फेब्रुवारी रोजी पालिका मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या कडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांनी दिली.
” विद्यार्थांच्या आरोग्याशी खेळ खेळणाऱ्या पुरवठा दारा विरुद्ध पालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे आशा पुरवठा दराचे पालिका प्रशासनाने आहाराचा ठेका रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी पालकांकडून करण्यात आली.”
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!