Homeआरोग्यपाडळसे गाव परिसरात वाघाचा वावर, पाळीव गुरांवर हल्ला, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे...

पाडळसे गाव परिसरात वाघाचा वावर, पाळीव गुरांवर हल्ला, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण..

भोरटेक येथील शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून वाघाने म्हशीला ठार केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे..

पोलीस वार्ता, जळगाव : यावल तालुक्यातील पाडळसे गाव परिसरात वाघामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी दि.15 जुलै रोजी पहाटे भोरटेक गावाजवळ एका पाळीव गुरांच्या गोठ्यावर वाघाने हल्ला करून एका म्हशीला ठार केले आहे, त्यामुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये वाघाच्या हल्ल्याची भीती वाढली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पाडळसे आणि आसपासच्या शिवारात वाघाच्या अस्तित्वाची चर्चा होती. काही ग्रामस्थांनी वाघाला प्रत्यक्ष पाहिले असल्याचा दावाही केला होता. मात्र, मंगळवारी पहाटे घडलेल्या या घटनेमुळे वाघाचा वावर निश्चित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
भोरटेक येथील शेतकऱ्याच्या गोठ्यात घुसून वाघाने म्हशीला ठार केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आपल्या पशुधनाच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत. शेतात एकटे जाण्यासही नागरिक घाबरत आहे, कारण वाघ मानवी वस्तीजवळ येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेची माहिती पाडळसे येथील पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी वन विभागाला कळविल्याने वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून वनक्षेत्रपाल यावल पूर्व एस.एम पटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डोंगरकठोरा आय.ए.एस तडवी, फैजपूर अतुल तायडे, गस्तीपथक आर.एम जाधव, वनरक्षक गणेश चौधरी, आय.बी चव्हाण, चालक वाय.डी तेली घटनास्थळी दाखल झाले असून वनविभागाकडून वाघाच्या पावलांचे ठसे आणि इतर पुरावे गोळा करून त्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच, ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वनविभागाने तातडीने या वाघाला पकडून सुरक्षित स्थळी हलवावे, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे. अन्यथा, भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत कासवा ग्रुप ग्रामपंचायत सदस्य अरुण कोळी यांनी स्थानिक आमदार अमोल जावळे यांना घटनेची माहिती दिली असून आमदार हे मुंबई विधानसभेच्या अधिवेशनासाठी गेले असल्याने त्यांनी मुंबईहून दुरध्वनीद्वारे वनक्षेत्रपाल स्वप्निल पटांगरे यांना वाघाला जेरबंद करण्याच्या आवश्यक सुचना दिल्या आहेत.

✍️पोलीस वार्ता संपादक: निलेश फिरके, भुसावळ, संपर्क: 09960333469
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!