Homeराजकीयगिरीशभाऊ महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; संबंधितांवर कारवाईची मागणी

गिरीशभाऊ महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न; संबंधितांवर कारवाईची मागणी

भुसावळ : सामाजिक माध्यमांवर मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीशभाऊ महाजन यांच्या विरोधात आक्षेपार्ह फोटो व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट प्रसारित करून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष (दक्षिण) तथा नगरसेवक किरण भागवत कोलते यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी संबंधित यंत्रणांकडे निवेदन सादर करून दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर (एक्स) व व्हॉट्सअॅप यांसारख्या सामाजिक माध्यमांवर गिरीशभाऊ महाजन यांच्या विरोधात आक्षेपार्ह व दिशाभूल करणारे फोटो हेतुपुरस्सर व्हायरल करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे जनमानसात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असून समाजात असंतोष व द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच एका लोकप्रतिनिधीची प्रतिमा मलिन करून त्यांच्या सामाजिक व सार्वजनिक जीवनाबाबत चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा, प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आलेले आक्षेपार्ह फोटो त्वरित हटविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी किरण कोलते यांनी केली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या खोट्या, आक्षेपार्ह व दिशाभूल करणाऱ्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या नाशिकरोड येथील ऐतिहासिक वास्तूला मंत्री संजय शिरसाट देणार भेट

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या या बंगल्याला राज्य शासनाने जतन व संवर्धन करावे.. पोलीस वार्ता, नाशिक | महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर सन 11 ऑक्टोबर 1935...

भुसावळ ते ठाणे NCB कनेक्शन

0
‘सोन्या’ला पहाटे ताब्यात घेत दिवसभर कसून चौकशी भुसावळ : खडका रोडवरील मोहम्मद अली रोड परिसरातून एजाज आयुब खान ऊर्फ ‘सोन्या’ यास ठाणे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या...

रावेरमध्ये शहरात घरफोडी करणारे आरोपी 24 तासांत गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात!

0
सीसीटीव्हीने शोध घेऊन आरोपींना अटक करून चोरीचे 50 हजार रोकड व तीन तोळे सोन्याचे दागिने जप्त.. पोलीस वार्ता, रावेर | शहरातील जुनी नगरपालिका रोड परिसरातील एका...

चोरट्यांचा खेळ खल्लास! घरफोडी करणारे पोलिसांच्या जाळ्यात…

0
पाच आरोपी अटकेत; ६ लाख १६ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.. निंभोरा पोलिसांची कारवाई; मुंबईसह खिर्डी येथून आरोपी ताब्यात... रावेर/प्रतिनिधी.. दि.23 विनायक जहुरे रावेर तालुक्यातील खिर्डी येथील...

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

error: Content is protected !!