Homeआरोग्यभुसावळला 'जागतिक योग दिन २०२६' उत्साहात साजरा!

भुसावळला ‘जागतिक योग दिन २०२६’ उत्साहात साजरा!

भुसावळ:- “निरोगी शरीर, शांत मन; हाच पोलिसांचा खरा दागिना” आणि “योग: कर्मसु कौशलम्” हा संदेश डोळ्यांसमोर ठेवून आज दिनांक २१ जून २०२६ रोजी जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या भुसावळ उपविभागातर्फे आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला.

माननीय पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या मार्गदर्शनानुसार भुसावळ येथील शहर वाहतूक शाखा (City Traffic Branch) येथे सकाळी ६:०० ते ८:०० या वेळेत या विशेष योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. केदार बारबोले, पोलीस निरीक्षक श्री. महेश गायकवाड आणि पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत शिबिराची सुरुवात करण्यात आली.

‘महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघ, भुसावळ’ यांच्या वतीने आयोजित या शिबिरात नामांकित योग प्रशिक्षक श्री. यश प्रसाद आंबेकर आणि डॉक्टर.राधा प्रसाद आंबेकर यांनी उपस्थित सर्व पोलीस बांधवांना मार्गदर्शन केले. त्यांनी योगासने, प्राणायाम, ध्यान आणि तणावमुक्तीसाठी उपयुक्त असणाऱ्या विविध योगक्रियांचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर प्रशिक्षण दिले. दैनंदिन पोलीस कर्तव्य बजावताना येणाऱ्या मानसिक व शारीरिक ताणतणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी योग साधना कशी जीवनशैलीचा भाग बनवता येईल, यावर त्यांनी विशेष भर दिला.

या योग शिबिरासाठी भुसावळ उपविभागांतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांचे (भुसावळ शहर, भुसावळ बाजारपेठ, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन आणि शहर वाहतूक शाखा) अधिकारी आणि पोलीस अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अत्यंत उत्साहाने व शिस्तीत सर्व योगासने पूर्ण केली.
​पोलीस दलातील प्रत्येक घटकाचे आरोग्य सुदृढ राहावे आणि त्यांच्यातील कार्यक्षमता वाढीस लागावी, या उद्देशाने राबवण्यात आलेले हे योग शिबिर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळच्या पाणीप्रश्नाला मिळणार ‘अमृत’ बळ!

0
टप्पा-२च्या जलकुंभाचे भूमिपूजन; ८० टक्के काम पूर्ण, टप्पा-१ची रखडलेली कामेही नव्या ठेकेदारांमार्फत पूर्ण करण्याचे नियोजन भुसावळ - शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्यावर येणारा ताण कमी करण्यासाठी...

शहरात शनिवार व रविवार रोजी मतदार संघातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष SRI अर्ज शिबिरांचे...

शिबिरात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी/BLO व पर्यवेक्षक दिवसभर मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदारांना मार्गदर्शन करतील.. पोलीस वार्ता, नाशिक | मतदान यादी पुनरीक्षण (SIR-2026) कार्यक्रमांतर्गत नाशिक जिल्ह्यातील...

जन-विश्वास से जनकल्याण की नई राह, ग्रामीणों के बीच पहुंचा जिला प्रशासन

0
जम्बूपानी से जन-विश्वास अभियान का शुभारंभ अंतिम छोर के नागरिकों तक पहुंचेगी शासन की योजनाएं, हर शुक्रवार ग्रामीणों से सीधा संवाद जनप्रतिनिधियों एवं प्रशासनिक अधिकारियों ने...

प्रभारी मंत्री श्री सिलावट ने वीडियो कॉन्फ्रेंसिंग से जिला प्रशासन के साथ की समीक्षा

0
मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान में ‘संवाद, समाधान, संवेदनशीलता और सादगी’ पर विशेष जोर हर घर तिरंगा एवं ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान में अधिकाधिक जनभागीदारी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर; खड्डे युक्त नाशिक आणि कुंभमेळ्याच्या कामावर...

नाशिकमध्ये विकासाच्या नावाखाली खोदकाम आणि खड्ड्यांचे जाळे तयार झाले असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर.. पोलीस वार्ता, नाशिक | कुंभमेळा कामांसाठी झालेले...

error: Content is protected !!