Homeशिक्षण-प्रशिक्षणभुसावळात जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

भुसावळात जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

भुसावळ – येथील उपविभागीय अधिकारी यांचे तापी  सभागृहामध्ये जिल्हाधिकारी जळगाव यांची सार्वत्रिक निवडणुक 2024 अंतर्गत 12-(अ.जा.) भुसावळ विधानसभा मतदारसंघ करिता आढावा बैठक झाली.

सदरील बैठकीमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जळगाव यांनी सर्व कर्मचाऱ्यांना अतिशय काळजीपूर्वक व अचूकपणे कामे पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.परवाना कक्ष
एकल खिडकी योजना..यांना कोणत्याही परवानगी घेतांना एकही त्रुटी असेल तरी अर्ज स्वीकारायचा नाही अशा सूचना दिल्या.
निवडणुक कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी.निवडणुकीवर प्रभाव टाकणारी सामग्री रोखण्यासाठी चौक्या उभारण्यात याव्यात. विविध पथके निर्माण करावे त्याकरीता मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे. निवडणूक संबंधित तक्रारींसाठी तयार करण्यात आलेल्या सी-व्हिजिल मोबाईल आपवर लक्ष ठेवावे. तात्काळ निराकरण करावे. मतदार जनजागृती मोहीम प्रभावीपणे राबवण्यात यावी.

तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बैठकी आधी तहसील कार्यालय गोदामातील ईव्हीएम पॅड व यंत्राची पाहणी करून सुरक्षीतते विषयी माहिती जाणून घेतली. पाऊस आल्यास कुठे गळती आहे का किंवा अनावधानाने आग लागल्यास अग्निशमन व्यवस्था चोख ठेवावी असे सांगितले.

12- भुसावळ विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील,
उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार नीता लबडे मॅडम, सहा अधिकारी तथा मुख्याधिकारी राजेंद्र फातले, सहा.निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पानझाडे उपस्थित होते.

तसेच संत गाडगे महाराज शाळेकडून मतदार राजा जागा हो यावर विद्यार्थिनींनी जिल्ह्याधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत पथनाट्य सादर करून दाखवले.निवडून आलेले उमेदवार पाच वर्षात कधी तोंड दाखवत नाही तसेच निवडणुकीत दिलेली आश्वासने ही पूर्ण करीत नाही अशा पुढाऱ्याल कदापी निवडून दयायचे नाही.निवडणूक आली की,हेच पुढारी पैसे वाटतात हजार,दोन हजार,पाच हजार असे कुठल्याही पैशाने बळी न पडता आपला मतदानाचा हक्क बजवा व एक चांगले सरकार निवडून दया असे आव्हाहन नागरीकांना पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आले.याप्रसंगी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील,तहसीलदार निता लबडे,गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे तसेच शाळेचे शिक्षक वृंद उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

गणपती मिरवणुकीत अल्पवयीन मुलीला मारहाण; न्हावीत काही काळ तणाव

0
न्हावी, ता. यावल : गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी महादेववाडा परिसरात उभ्या असलेल्या १६ वर्षीय मुलीला युवकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना रविवारी रात्री घडल्याची माहिती...

सोमेश्वर महाराजांच्या आगमनाने रामायण नगरात भक्तिमय वातावरण

0
हॉटेल राधाकृष्णपासून ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक; ‘महाकाल’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला भुसावळ : उज्जैन येथील सोमेश्वर महाराजांचे भुसावळ शहरातील रामायण नगर परिसरात आगमन झाले. महाराजांच्या आगमनानिमित्त...

error: Content is protected !!