आरोपींकडून एकुण 65,000/- रू किंमतीचे 13 ग्रॅम वजनाचे एम.डी.(मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ विक्रीसाठी मिळून आले. मोबाईल फोनसह एकूण 95,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला..
पोलीस वार्ता, नाशिक : शहरात वाढती गुन्हेगारी आणि अवैद्य धंदे यांवर कारवाई करण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री.संदिप कर्णिक साहेब यांनी शहर गुन्हे शाखेंना सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार दि.4 एप्रिल 2025 रोजी शहर गुन्हेशाखा युनिट-2 पथक हद्दीत गस्त करीत असताना त्यांना अवैद्यरित्या एमडी विकी करणाऱ्यांची गोपनीय माहिती पोह. नितीन फुलमाळी यांना मिळाली की, दि.4 मार्चला रात्री 9.30 ते 10.30 वाजेच्या दरम्यान जनार्दन स्वामी पुला शेजारी, नांदुरनाका-जेलरोड, नाशिकरोड भागात अंमली पदार्थ एम.डी.(मॅफेड्रॉन) पावडर विक्री करण्याकरीता दोन संशयित येणार आहे. सदर माहिती वरिष्ठांना देऊन, त्यांच्या मार्गदर्शनात, पोनि. श्रीमती सुशिला कोल्हे, सपोनि. पाटील, सपोनि. हेमंत तोडकर, सपोनि. डॉ.समाधान हिरे, सपोउनि. बाळु शेळके, विलास गांगुर्डे, पोह. नितीन फुलमाळी, सुनिल आहेर, मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, पोअं. प्रविण वानखेडे, संजय पोर्टींदे, पोअं. सुनिल खैरनार यांचे पथक तयार करून माहिती नुसार घटनास्थळी जावून रात्री 10 वाजेला सापळा लावला असता. संशयित तेथे दिसून येताच यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली.
त्यांची नावे 1)जय सुनिल फिरके (वय 25) रा. घर नं-9 अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिकरोड 2)अंकुश शांताराम चौधरी (वय 25) रा. सी.जी.1, म्हाडा बिल्डींग, अश्विनी कॉलनी, सामनगाव रोड, नाशिकरोड, अशी माहिती दिली. तसेच त्यांची झडती घेतली असता फिरके याच्या कडून 40,000/- रू किंमतीचे 8 ग्रॅम आणि चौढरी यांच्याकडून 25,000/- रू. किंमतीचे 5 ग्रॅम असे एकुण 65,000/- रू किंमतीचे 13 ग्रॅम वजनाचे एम.डी.(मॅफेड्रॉन) अंमली पदार्थ विक्रीसाठी मिळून आले. मोबाईल फोनसह त्याच्याकडून एकूण 95,000/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरूध्द पोह. नितीन फुलमाळी यांनी आडगाव पोलीस ठाणे येथे शासनाच्या वतीने फिर्यादी होवुन गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींना मुद्देमालासह आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री.प्रशांत बच्छाव, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-2 कडून करण्यात आली. पथकात गुलाब सोनार, प्रकाश बोडके, महेश खांडबहाले, पोअं. योगेश सानप, चंद्रकांत बागडे यांचा देखील समावेश होता.
✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा
भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...