Homeक्राईमभुसावळात नायलॉन मांजा विक्रीवर पोलिसांचा छापा; श्रीराम नगरातील इसम अटकेत

भुसावळात नायलॉन मांजा विक्रीवर पोलिसांचा छापा; श्रीराम नगरातील इसम अटकेत

भुसावळ : शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री केल्याप्रकरणी भुसावळ शहरातील श्रीराम नगर परिसरात पोलिसांनी छापा टाकून एका इसमास अटक केली. ही कारवाई १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी साडेतीन ते साडेचारच्या सुमारास करण्यात आली.

स्थानीय गुन्हे शाखा, जळगाव येथे कार्यरत पोलीस कर्मचारी राहुल वानखेडे यांच्या फिर्यादीनुसार, गुप्त बातमीदारामार्फत भुसावळ शहरातील श्रीराम नगर भागात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली.त्यानुसार पोउप निरी.रवि नरवाडे, पोलीस नाईक उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी आदी पथक पंचांसह खासगी वाहनाने घटनास्थळी रवाना झाले.

श्रीराम नगर परिसरातील हनुमान मंदिराजवळील मोकळ्या जागेत छापा टाकण्यात आला असता, काशीनाथ देवीदास राठोड (वय ४८, रा. श्रीराम नगर, भुसावळ) हा इसम नायलॉन व पक्क्या धाग्यापासून बनवलेला मांजा विक्री करतांना आढळून आला. त्याच्या ताब्यातून हिरव्या, काळ्या व नारंगी रंगाच्या नायलॉन मांजाचे एकूण चार बंडल जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत ४ हजार रुपये आहे.
नायलॉन मांजामुळे मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, याची पूर्ण जाणीव असूनही केवळ आर्थिक फायद्यासाठी त्याची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पंचनामा करून जप्त केलेला मुद्देमाल सील करण्यात आला असून आरोपीस भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२५, २२३ तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियमातील कलम ५ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल रविकिरण झाल्टे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीसह नणंदेला जन्मठेप

0
दोघांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड; दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद भुसावळ : चारित्र्याच्या संशयातून विवाहित महिलेची लाकडी ओंडक्याने मारहाण करून हत्या केल्याप्रकरणी पतीसह...

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

error: Content is protected !!