भोर : (संतोष मोहिते) पंचक्रोशी तसेच सातारा परिसरात गेल्या अकरा वर्षांपासून गोरगरिबांच्या सेवेत अखंड कार्यरत असलेले सर्वांचे लाडके डॉ. मंदार सुरेश माळी हे आज जनतेसाठी आधारस्तंभ आणि ‘धन्वंतरी’ म्हणून ओळखले जात आहेत. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत तसेच तरुणाईमध्ये त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून विशेष स्थान निर्माण केले आहे.
सामाजिक कार्याबरोबरच वारकरी संप्रदायातही त्यांचा सक्रिय सहभाग असून, तरुणांमध्ये संघटनात्मक आणि सांस्कृतिक कार्यातून त्यांनी आपले कला-कौशल्य जपले आहे. नुकतेच त्यांची भारतीय जनता पार्टीच्या उत्तर कार्यकारिणी आघाडीत उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर समाजात त्यांच्या कार्याबद्दल कौतुकाची लाट उसळली आहे.
गेल्या सहा महिन्यांत त्यांनी आपल्या पदाला साजेसे काम करत विविध भागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेतल्या. वैद्यकीय दृष्ट्या गरजू रुग्णांना पक्षामार्फत तसेच विविध शासकीय योजनांद्वारे आवश्यक सुविधा आणि उपचार मिळवून देण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले. यासोबतच योजनांची संपूर्ण माहिती आणि त्यातील लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवून त्यांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे.
यामुळे सरकारी योजनांबद्दल जनतेत सकारात्मक भावना निर्माण झाली असून, “डॉक्टर म्हणजे केवळ उपचार नव्हे तर विश्वास” असा ठसा डॉ. माळी यांनी आपल्या कार्यातून उमटवला आहे. त्यांच्या या जनसेवेच्या कार्यामुळे भोर आणि परिसरात त्यांचे नाव आदराने घेतले जात आहे.


































