Homeक्राईमवरणगावात भारत गॅस गुदाम फोडून ५८ सिलिंडरांची चोरी

वरणगावात भारत गॅस गुदाम फोडून ५८ सिलिंडरांची चोरी

सीसीटीव्ही बंद ; सुरक्षारक्षक नसल्याने चोरट्यांचा डाव यशस्वी

भुसावळ – तालुक्यातील वरणगाव शहराजवळील बोहर्डी शिवारातील लालमाती परिसरात असलेल्या भारत गॅस गोडाऊनमध्ये अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून ५८ भरलेले गॅस सिलिंडर चोरी केल्याची घटना बुधवारी (दि. २६) सकाळी उघडकीस आली.चोरीस गेलेल्या सिलिंडरांची एकूण किंमत सुमारे ७४ हजार १२४ रुपये असल्याची माहिती आहे.

याप्रकरणी रोहंत गॅस एजन्सीचे संचालक नरेंद्र उत्तमराव आहिरे (वय ५१, रा. शांतिनगर, भुसावळ) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांची रोहंत गॅस एजन्सी ही भारत गॅस कंपनीची वितरक असून मुख्य कार्यालय मकरंद नगर, वरणगाव येथे आहे. संबंधित गोडाऊनमध्ये जळगाव येथून आलेल्या भरलेल्या सिलिंडरांचा साठा ठेवला जातो. फिर्यादीनुसार, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गोडाऊनमध्ये १९५ सिलिंडर शिल्लक होते.गोडाऊन कीपरने दोन कुलपे लावून चाव्या मालकाकडे सुपूर्द केल्या होत्या. मात्र २६ फेब्रुवारी रोजी सकाळी गोडाऊनचे कुलूप तोडलेले आढळले. गोडाऊनच्या बाहेर पाच सिलिंडर पडलेले दिसून आले,तर ५८ सिलिंडर चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, गोडाऊनमध्ये मागील दोन वर्षांपासून सुरक्षारक्षक नसल्याचे तसेच २१ फेब्रुवारीपासून सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे सुरक्षेतील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षीताई पोळ यांची विशेष कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती!

0
शिवसेना सातारा जिल्हा तसेच कराड तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मीनाक्षीताई यांचे अभिनंदन.. पोलीस वार्ता, पुणे | सातारा जिल्ह्यातील उंब्रज येथील सामाजिक कार्यकर्त्या मीनाक्षीताई बबनराव पोळ...

बागुल परिवारात महालक्ष्मी व गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

0
भुसावळ : बागुल परिवारामध्ये गणपती बाप्पा आणि महालक्ष्मीचे भक्तिमय वातावरणात उत्साहात आगमन झाले. यानिमित्ताने परिवारात धार्मिक वातावरण निर्माण झाले असून, विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाचे...

पुलिस अधिकारी एवं कर्मचारियों का किया सन्मान

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) उड़ान लिनेस क्लब ग्रुप ऑफ़ बुरहानपुर सहेली द्वारा क्लब की फाउंडर और संपादक लिनेस रफत आसिफ खान के नेतृत्व में गुरुवार दोपहर...

नियम ताक पर रखकर सीलबंद अस्पताल को बिना सुधार के पुनः संचालन की अनुमति...

0
आयुष्मान घोटाले और प्रशासनिक सांठगांठ की निष्पक्ष जांच की मांग रमाकांत मोरे ‌ बुरहानपुर: अमरावती रोड स्थित चर्चित गुड अस्पताल को लेकर एक बार फिर प्रशासन और...

ग्राम पंचायत पीपरी बोरवन में ग्राम सभा जन-जागरूकता रैली आयोजित

0
खकनार पीपरी बोरवन - आगा खान ग्राम समर्थन कार्यक्रम (भारत) की ओर से आज ग्राम पीपरी में ग्राम सभा जन-जागरूकता रैली का आयोजन किया...

error: Content is protected !!