मायनिंगमुळे उडणाऱ्या धुळीतून गावकऱ्यांना श्वसनासंबंधी त्रास सहन करावा लागत आहे, हवेतील प्रदूषण आणि माईन्सकामामुळे होणारे हादरे..
पोलीस वार्ता, यवतमाळ : वणी तालुक्यातील कुंद्रा गावा लगत असलेल्या ‘जगदंब मिनरल्स गिट्टी खदान’मध्ये बरेच दिवसापासून काम चालू आहे. या खदान कामामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माईनिंगमुळे दगड जात असल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे व ब्लास्टोंनमुळे गावातील घरांना हादरा बसून धोका निर्माण होत आहे. मायनिंगमुळे उडणाऱ्या धुळीतून गावकऱ्यांना श्वसनासंबंधी त्रास सहन करावा लागत आहे. हवेतील प्रदूषण आणि माईन्सकामामुळे झालेल्या खड्ड्यात पाणी साचून शेतकऱ्यांना शेतात जाणे येणे कठीण झाले आहे. या सर्व कारणांमुळे शेती पिकांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचा रोष दिसून येत आहे.
या ‘जगदंब मिनरल्स’ खदानीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी कुंद्रा ग्रामपंचायतीचे सरपंच विजय ठावरी, उपसरपंच सौ.पल्लवी भोस्कर, व्ही.पी भगत तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ गोरे यांच्या वतीने मुख्य उपविभागीय अधिकारी महसूल विभाग, तालुका वणी यांना निवेदन देण्यात आले आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला आहे.
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी..
पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या..
पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...