फैजपुर ( सलिम पिंजारी) नगर पालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारी तसेच कुशल अकुशल ठेकेदारी मध्ये भ्रष्टाचार झाले असून याची चौकशी व्हावी अन्यथा दि १ में रोजी धरणे आंदोलन व दि २ में २०२५ पासून उपोषणाला बसण्याचा इशारा माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांनी फैजपूर पालिकेचे प्रशासक व मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.की फैजपूर नगरपालिकेमध्ये घनकचरा व्यवस्थापन ठेकेदारीमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व दि १ एप्रिल २०२४ ते दि ३१ मार्च २०२५ मध्ये वाहने दुरुस्ती करून घेणे व कर्मचारी यांचे इ पी एफ ओ ई एस आय सी वसूल करणे आणि घनकचरा डेपोवर कचरा प्रक्रिया केलेली नाही. हे होईपर्यंत बिल अदा करू नये तसेच फैजपूर नगरपरिषद मध्ये कुशल व अकुशल ठेकेदारी मध्येझालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी व दि १ एप्रिल २०२२ ते दि ३१ मार्च २०२५ पर्यंत तीन वर्षांचे इ पी एफ ओ ई एस आय सी वसूल करणे तो पर्यंत बिल व अनामत अदा करू नये तसेच फैजपुर नगरपरिषदमध्ये सार्वजनिक शौचालय देखभाल दुरुस्ती करण्याबाबत कोणतेही होत नसून जास्तीचे सीट दाखवून काढत ते थांबवणे व तात्काळ चौकशी होवून संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी केलेल्या तक्रारी विषयी पालिकेने दि १७/४/२०२५ रोजी शेख कुर्बान यांना दिलेल्या पत्रात या विषयी किती दिवसांत चौकशी अहवाल देणार असा उल्लेख केला नसल्याने दि ३० एप्रिल २०२५ पर्यंत शेख कुर्बान यांना लेखी खुलासा न मिळाल्यास दि १ में २०२५ धरणे आंदोलन करण्यात येईल व दि २ में २०२५ पासून फैजपूर प्रांत कार्यालय व फैजपूर नगरपालिका समोर सुरू करणार असा इशारा माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांनी आज दि २१ रोजी फैजपूर प्रांत तथा प्रशासक बबनराव काकडे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.दरम्यान प्रांत तथा प्रशासक बबनराव काकडे यांच्या विनंतीला मान देवून उपोषण रद्द केल्याचे शेख कुर्बान यांनी सांगितले आहे.






























