Homeआरोग्यकल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत रस्त्यावरील शासनमान्य टपऱ्या ठरताय नागरीकांना डोकेदुखी?

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत रस्त्यावरील शासनमान्य टपऱ्या ठरताय नागरीकांना डोकेदुखी?

टपऱ्यांवर कारवाई झाली तर टपरी मालक, पालिका अधिकाऱ्यांना होणाऱ्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे टपऱ्यांवर पालिका कारवाई करत नसावी,

पोलीस वार्ता, ठाणे : शासनाची मान्यता असलेले फलक लावलेल्या बऱ्याच टपऱ्या काही वर्षांपासून कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील मुख्य वर्दळींच्या रस्त्यावर पडक्या अवस्थेत आढळून येतात. या टपरी मालकांनी या टपऱ्यांमध्ये व्यवसाय करावा अशी अपेक्षा असते परंतु ते ह्या टपऱ्या परप्रांतीयांना भाड्याने देतात अशा तक्रारी आहेत. यात सिगारेट, गुटखा, पान मसाला अश्या विविध प्रकारच्या आरोग्य विघातक वस्तू पदार्थ यात विक्री केले जातात याकडे पालिकेचे दुर्लक्ष असते. या टपऱ्या मुख्य रस्त्यावर असल्यामुळे वाहतुकीस अडथळा ठरत आहे.
रस्त्यांवर, गटारांवर, फुटपाथवर या टपऱ्या ठेवल्या असल्याने या टपऱ्या आता पादचाऱ्यांना, रहदारीला त्रासदायक ठरत आहेत. टपऱ्यांवर कारवाई झाली तर टपरी मालक, पालिका अधिकाऱ्यांना होणाऱ्या चौकशीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे टपऱ्यांवर पालिका कारवाई करत नसावी. असा सूर येथील नागरिकांमध्ये दिसून येतो आहे.
एकीकडे कल्याण डोंबिवली पालिका शहराच्या विकासासाठी व सौंदर्य करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसतात परंतु शहरातील हा टपऱ्यांचा विषय सौंदर्य बिघडवत असताना यावर मात्र पालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे.

शासनमान्य टपऱ्यांच्या संदर्भात महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ह्या टपऱ्या शासनमान्य असून त्या पालिकेनेच वितरित केल्यास आहेत. त्यांना नोंदणी क्रमांक देखील दिलेला आहे, जर त्या वाहतुकीला अडथळा ठरत असेल तर वाहतूक विभागाने तशी आम्हाला तक्रार द्यावी त्यानुसार कारवाईचा विचार केला जाईल.
तथापि, नागरिकांनी देखील लेखी तक्रारी देऊन पालिका अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे, या टपऱ्या शासनमान्य असल्या तरी त्या चुकीच्या ठिकाणी ठेवून लोकांच्या जीवावर बेतू शकतात त्यामुळे होणारे अपघात हे भयंकर ठरू शकतात.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दिपनगर रुग्णालयातील प्रकरणांची होणार चौकशी? मुख्य अभियंत्यांच्या भूमिकेकडे लागले लक्ष

0
भुसावळ : तालुक्यातील औष्णिक विद्युत केंद्र, दिपनगर येथील महाजनको रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व रुग्णालय व्यवस्थापक गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असून त्यांच्या कार्यकाळात विविध वादग्रस्त...

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

error: Content is protected !!