Homeआरोग्यएसटी भाडेवाढ; सर्व बस तिकीट दरात 14 टक्क्यांनी भाडेवाढीचा प्रस्ताव..

एसटी भाडेवाढ; सर्व बस तिकीट दरात 14 टक्क्यांनी भाडेवाढीचा प्रस्ताव..

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस गाड्यांमध्ये जानेवारीपासून होणार 14 टक्क्यांनी भाडेवाढ, सामान्य प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार..

जानेवारी 2025 पासून एसटी भाड्यात 14 टक्क्यांनी भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव..
पोलीस वार्ता, मुंबई : राज्य परिवहन महामंडळाने 2025 सालाच्या जानेवारीपासून सर्व प्रकारच्या बस गाड्यांमध्ये 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव आगामी संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर होण्याची शक्यता आहे. यानंतर राज्य सरकारची मंजुरी मिळाल्यावर भाडेवाढ लागू होईल, ज्यामुळे सामान्य प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार येणार आहे.
एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी भंडारा विभागातील अपघात आणि कुर्ला बस अपघाताच्या संदर्भात मुंबई सेंट्रलमधील महाराष्ट्र वाहतूक भवन येथे तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला बस पुरवठादार आणि एसटीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत एसटी अपघात रोखण्यासाठी तीन महत्त्वाच्या बाबींवर भर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे: चालकांचे प्रशिक्षण, मानसिक आरोग्य आणि वाहनांचे तांत्रिक निर्दोषत्व. अध्यक्ष गोगावले यांच्या मते, या त्रिसूत्रीच्या मदतीने एसटी अपघातांची संख्या कमी होईल आणि सुरक्षिततेची दृष्टीने सुधारणा होईल.

विधानसभा निवडणुकांपूर्वी 18 टक्के भाडेवाढ प्रस्तावित केली होती, परंतु आता त्यात 14 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एसटी महामंडळात 2021 पासून भाडेवाढ प्रलंबित होती, आणि निवडणुकीमुळे हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली होती. कर्मचाऱ्यांचे पगार, इंधनाचे वाढलेले दर, तसेच सुट्याभागांची किंमत वाढल्यामुळे भाडेवाढ आवश्यक झाली आहे. नवा प्रस्ताव संचालक मंडळाच्या मान्यतेनंतर सरकारकडे पाठवला जाईल, आणि सरकारच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी होईल, असे एसटी अधिकारी सांगत आहेत.
एसटी महामंडळाच्या चालकांना दर 6 महिन्यांनी उजळणी प्रशिक्षण दिले जाते, ज्यात चालकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणं आणि बस चालवण्याचे कौशल्य सुधारण्यावर विशेष भर दिला जातो. प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष वाहन चालन चाचणी घेतली जाते, आणि त्यानंतरच चालकांना सेवेत पुनश्च दाखल केले जाते. याच प्रकारे, खासगी बस चालकांना देखील उजळणी प्रशिक्षण देण्याची सुचना अध्यक्ष भरत गोगावले यांनी बैठकीत दिली.
त्याचप्रमाणे, एसटी महामंडळ आणि ऑलेक्ट्रा ईव्हे ट्रान्स यांच्यात नोव्हेंबर 2023 मध्ये 5,150 वातानुकूलित ई-बस पुरवण्याचा करार झाला होता. मार्च 2024 पासून दर महिना 215 बस पुरवण्याची अपेक्षा होती, परंतु नोव्हेंबर 2023 पर्यंत केवळ 223 बस दाखल झाल्या आहेत. या विलंबाबद्दल कारणे दाखवा नोटीस संबंधित बस पुरवठादारांना जारी करण्यात आली आहे. अध्यक्ष गोगावले यांनी संबंधित कंपन्यांकडून योग्य, वस्तुनिष्ठ आणि सप्रमाण कारणे न मिळाल्यास त्यांचे कंत्राट रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रक्षकच बनले भक्षक, पोलिसच सहआरोपी 20 लाखांची रोख रक्कम लुटण्याचा होता डाव?

महिला पोलीस हवालदार व बोगस पत्रकाराच्या मदतीने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम 20 लाख रुपये काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला.. पोलीस वार्ता, पुणे | नवले पूल...

चापोरा सरस्वती शिशु मंदिर में निशुल्क स्वास्थ्य शिवीर संपन्न

0
बुरहानपुर (रमाकांत मोरे) जिले के ग्राम चापोरा के सरस्वती शिशु मंदिर परिसर में ऑल इज़ वेल हॉस्पिटल बुरहानपुर द्वारा रविवार 26 जुलाई को नि:शुल्क स्वास्थ्य...

पुलिस द्वारा नशा मुक्ति जागरूकता अभियान

0
"नशे से दूरी है जरूरी" 2.0 के तहत विभिन्न कार्यक्रम आयोजित व्यापारी वर्ग, एनजीओ, सोशल ग्रुप के सहयोग से शॉपिंग मॉल, मार्केट, हाट बाजार, सार्वजनिक...

“राष्ट्र प्रथम” की भावना के साथ ताप्ती सेवा समिति ने कारगिल शहीदों को श्रद्धांजलि...

0
बुरहानपुर, (डॉक्टर प्रवीण पाटिल) 26 जुलाई। कारगिल विजय दिवस के अवसर पर ताप्ती सेवा समिति, बुरहानपुर द्वारा वीर जवानों के स्मारक पर पहुँचकर कारगिल युद्ध...

बुरहानपुर पुलिस की बड़ी कार्रवाई, अवैध देशी पिस्टल के साथ अंतरजिला बदमाश गिरफ्तार

0
बुरहानपुर। बुरहानपुर जिले की खकनार पुलिस ने अवैध हथियारों के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए एक शातिर अंतरजिला अपराधी को गिरफ्तार किया है। आरोपी...

error: Content is protected !!