Homeआरोग्यअपंगत्व-आजारपण सांभाळत समाजसेवेची आवड जोपासणाऱ्या श्रीमती 'स्नेहप्रभा अरणकुल्ने' यांना महिला दिनी मानाचा...

अपंगत्व-आजारपण सांभाळत समाजसेवेची आवड जोपासणाऱ्या श्रीमती ‘स्नेहप्रभा अरणकुल्ने’ यांना महिला दिनी मानाचा मुजरा!

स्नेहप्रभा अरणकुल्ने ह्या विविध वस्त्रांची झबली, टोपडे, धुपटे असे कपडे शिवण काम करणे, आणि तयार केलेले वस्त्रे ते गरजू गोरगरिबांच्या बाळांसाठी देतात..

पोलीस वार्ता, बारामती : आज “आंतरराष्ट्रीय महिला दिन’ या दिनानिमित्त समाजातील ज्या महिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळून समाजकार्ये करत असतात अश्या महिलांना 8 मार्च या महिला दिनी सन्मानीत केले जाते, पुरस्कार दिले जातात. कारण ह्या महिला इतर महिलांना एक आदर्श निर्माण करतात आणि त्यांना आयुष्यात पुढे जाण्याच्या संधी उपलब्ध करून देतात.

परंतु समाजात अश्या देखील समाजसेविका आहेत जे त्यांच्या वैयक्तिक अडीअडचणी आणि शरीराचे आजार ह्यांच्याशी संघर्ष करत आपली समाजसेवेची आवड जपत आहे. त्यांना यासाठी कुठल्याही सन्मानाची अथवा पारितोषिकाची गरज नाही.
श्रीमती स्नेहप्रभा अरणकुल्ने (अष्टपुत्रे) अश्याच एका प्रेरणादायक प्रवासाचे व्यक्तिमहत्व असलेल्या महिला आहेत, स्नेहप्रभा या 80 वर्षाच्या असून यांचे शिक्षण एम.ए, बी.एड झालेले आहे, त्या सध्या पिंपरी-चिंचवड येथील रहिवासी असून त्यांना ‘वाघेश्वर विद्याधाम’ शिरूर येथे आदर्श शिक्षिका म्हणून सेवाही केली आहे. त्यांच्या कार्यामुळे त्यांना ‘आदर्श शिक्षिके’चा पुरस्कार मिळालेला आहे. आज, त्या शरीराने अपंग असतानाही स्वतःला वाचनात मग्न ठेवतात, सामाजिक कार्यात सहभागी होतात, त्यांचा एक खास छंद; विविध वस्त्रांची झबली, टोपडे, धुपटे असे कपडे शिवण काम करणे, आणि तयार केलेले वस्त्रे ते गरजू गोरगरिबांच्या बाळांसाठी देऊ करतात. यात त्यांना आर्थिक मोबदल्याची अपेक्षा नसते. या कामातून ते त्यांची समाजसेवेची आवड आणि छंद जोपासतात.

2019 साली त्यांचे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे येथे हार्ट व्हॉल्वची सर्जरी झाली होती, त्यानंतर 2021 मध्ये कोरोना लॉकडाऊनच्या काळात त्या बेडवरून खाली पडल्या होत्या, त्यात त्यांचे खांद्याचे हाड मोडले, तत्काळ दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये त्याची सर्जरी करून त्यांना पुन्हा रिकव्हर करण्यात आले. त्यांच्या पायाला 36 टाके पडले आणि त्यामुळे त्यांना चालता येत नाही. म्हणून त्या वॉकरची मदत घेतात,अश्या दुखण्यामुळे त्या अपंग झाल्या आहेत, तरीही जिद्दीने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने त्यांनी अपंगत्वावर मात करत आपली समाजसेवा चालूच ठेवली आहे.
“आपण समाज्याचा भाग आहोत आणि समाज्यात वावरत असताना आपण समाजाचे काही देणं लागतो, हा विचार डोळ्यासमोर ठेवून ‘स्नेहप्रभा’ ह्या कार्य करत आजही आनंद आणि समाधान मिळवत आहे. त्यांच्या जीवनाची संघर्ष गाथा व समर्पित समाजसेवा त्यांना खूप प्रेरणादायक बनवते. अश्या ज्येष्ठ समाजसेविकेला ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ निमित्त मानाचा मुजरा!

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: वर्षा चव्हाण, बारामती, संपर्क: 9763852891
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!