पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली होती की, स्कॉर्पिओ वाहनातून देशी दारूची अवैधरित्या वाहतूक होत आहे..
पोलीस वार्ता, यवतमाळ : अवैध मद्यसाठा तसेच संशयास्पद माल वाहतूक करणाऱ्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश पांढरकवडा पोलीसांना वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यानुसार पांढरकवडा पोलीस ठाण्याचे पोकाँ राम राजुसिंग राठोड व सूर्यकांत गिते हे पाटणबोरी परिसरात दि.19 सप्टेंबर 2025 रोजी, रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना, त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, एका विना नंबरच्या स्कॉर्पिओ वाहनातून देशी दारू साठ्याची अवैधरित्या वाहतूक होत आहे. सदर माहिती मिळताच पोहेकॉ गजानन पत्रे यांना मदतीसाठी बोलावून माहितीनुसार कोपा-मांडवी फाट्यावर पोलीस पथकाने नाकाबंदी करून पांढरकवडाच्या दिशेने येणारी काळ्या रंगाची विना नंबर स्कॉर्पिओ गाडी दिसताच तिला थांबवून त्यात बसलेल्या दोन जणांची विचारपूस केली, त्यांनी त्यांचे नावे 1)अमित मोहन जाधव (वय-30), व्यवसाय- चालक, रा. उमरी, ता.केळापूर, जि.यवतमाळ, 2)संस्कृत दत्तात्रय गटलेवार (वय-28), गाडी मालक, रा. नेहरू नगर, घाटंजी, जि.यवतमाळ, अशी माहिती दिली. त्यांच्या गाडीची तपासणी केली असता.


























