Homeआरोग्यशहर गुन्हेशाखा युनिट-1 ची कामगिरी, दोघा अज्ञात चोरांना सोन्याची पोतसह 1,90,000...

शहर गुन्हेशाखा युनिट-1 ची कामगिरी, दोघा अज्ञात चोरांना सोन्याची पोतसह 1,90,000 किंमतीच्या मुद्देमालासह अटक

दोन अज्ञातांनी घरात घुसून महिलेची सोन्याची पोत गळ्यातून खेचुन चोरून नेली होती, पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता..

पोलीस वार्ता, नाशिक : पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत दि.11 सप्टेंबर 2025 रोजी एका वयोवृद्ध महिलेला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोन अज्ञातांनी घरात घुसून महिलेची सोन्याची पोत तिच्या गळ्यातून खेचुन चोरून नेली होती याबाबद फिर्यादी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुरनं- 432/2025 भा.न्या.सं 309(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. या अतिसंवेदनशिल गुन्ह्याचा तपास करून त्या अज्ञात चोरांचा शोध घेण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्त कर्णिक साहेब यांनी शहर गुन्हे शाखेला दिले होते.

त्यानुसार शहर गुन्हेशाखा युनिट-1 चे पोलीस पथक चोरांचा शोध घेत असतांना पोह. विशाल काठे व नाझिमखान पठाण यांना गुप्त खात्रीशीर माहिती मिळाली की, पंचवटी हद्दीतील दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन्ही संशयीत आरोपी गुन्ह्यात वापरलेल्या त्यांच्या सिल्वर रंगाच्या ऍक्सेस मोपेड दुचाकी क्र- एमएच 15 डीजी 2471 यावरून शहरातील उपनगर, जेलरोड भागात येणार आहेत. ही माहिती त्वरित शहर गुन्हे शाखेचे वपोनि. मधुकर कड यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनात पोउनि. चेतन श्रीवंत, पोह. प्रविण वाघमारे, संदिप भांड, प्रशांत मरकड, नाजीमखान पठाण, विशाल काठे, मिलींदसिंग परदेशी, प्रदीप म्हसदे, विशाल देवरे, पोअं. अमोल कोष्टी, मुक्तार शेख यांचे पोलीस पथक तयार करून कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने उपनगर परिसरात पाडेकर गॅस एजन्सी जवळ सापळा लावुन, संशयित दिसतात दोघांना ताब्यात घेतले.
त्यांचे नावे विचारता त्यांनी 1) प्रथमेश नितिन उशीर (वय-22), रा- फ्लॅट नं-4, निशिगंधा अपार्टमेंट, टाकळीरोड, शांतीपार्क, उपनगर, नाशिक 2) जोएल डेनियल म्हस्के (वय-19) रा- 203, ओमकार हाइट्स, परिजात नगर, विठठ्ठल मंगल कार्यालयाजवळ, जेलरोड, नाशिकरोड, नाशिक अशी माहिती दिली. त्यांना दुचाकी व गुन्ह्याची विचारपूस करता त्यांनी सुरुवातीला टाळाटाळ केली त्यानंतर त्यांना विश्वास घेऊन विचारले त्यांनी सोन्याचे मंगळसुत्र बळजबरीने हिसकावुन नेल्याची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यातील मोपेड ऍक्सेस दुचाकी व चोरलेल्या सोन्याचे मंगळसुत्र असा एकूण 1,90,000/- रुपये किंमतीचा मु‌द्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना पुढील तपासासाठी मुद्देमालासह पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात घेण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री.संदिप कर्णिक साहेब, मा.पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, मा.सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री.संदिप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 कडून करण्यात आली. पथकात पोउनि/सुदाम सांगळे, महेश साळुंके, रमेश कोळी, उत्तम पवार, पोअं. आप्पा पानवळ, राम बर्डे, नितीन जगताप, विलास चारोस्कर, राम बर्डे, मपोअं. अनुजा येलवे, चापोह. सुकाम पवार, पोअं. समाधान पवार यांचा देखील समावेश होता.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: गौतम जाधव, नाशिक, संपर्क: 9922838959
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!