Homeआरोग्यचर्च ऑफ गॉड संस्था आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या सहकार्याने शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण...

चर्च ऑफ गॉड संस्था आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या सहकार्याने शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न!

चर्च ऑफ गॉड ही संस्था नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून लोक सहभागातून सामाजिक उपक्रम करतांना दिसते..

पोलीस वार्ता, नाशिक : पर्यावरणाचा समतोल राखणे व पर्यावरणाची हानी रोखणे ही आपल्या प्रत्येकाची नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे. पृथ्वीवरील जैवविविधतेचे रक्षण करून, झाडे लावून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ठोस पावले उचलण्याची काळाची गरज आहे. पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारून भविष्यासाठी हरित आणि संतुलित पर्यावरण निर्माण करण्यात आपले योगदान द्यावे याच उद्देशाने वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड या संस्थेच्या वतीने 24 ऑगस्ट 2025, रविवार रोजी आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम नाशिक रोड भागातील बुद्धिस्ट(बौद्ध) इंटरनॅशनल स्कूल येथे संपन्न झाला.

चर्च ऑफ गॉड ही संस्था नेहमीच वेगवेगळ्या माध्यमातून लोकसहभागातून सामाजिक उपक्रम करतांना दिसते. यावेळी नाशिक शहरातील एकलहरा रोड येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या सहकार्याने शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. रविवार रोजी सकाळी 11 वाजता चर्च ऑफ गॉड या संस्थेचे सदस्य व त्यांचे कुटुंबीय तसेच बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचे संचालक व सदस्य आणि आलेले मान्यवर, स्वयंसेवक यांनी एकत्र येत शाळेभोवतीच्या प्रांगणाची स्वच्छता करून 30 झाडांचे वृक्षरोपण केले.

यावेळी चर्च ऑफ गॉड या संस्थेच्या वतीने आलेले मान्यवर शाळेचे संचालक श्री.नितीन डांगळे, मुख्याध्यापिका योगिता थोरात तसेच शिल्पा अहिर, सुष्मा उबाळे, राजाभाऊ सोनवणे, राजेश जाधव, सोनाली मोरे, देव वाद्य, मीडियाचे उमेश फिरके, बंटी आढाव, राज निकाळे यांचे स्वागत व सन्मान करण्यात आला.

चर्च ऑफ गॉड या संस्थेच्या अधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळी पर्यावरण पूरक संदेश देताना म्हटले की, “आम्ही सजीव सृष्टीचे अस्तित्व असलेल्या पृथ्वीच्या पुढील भविष्यासाठी विविध पर्यावरण संवर्धक उपक्रम राबवत आहोत. आम्हाला आशा आहे, यामुळे शहराचे सौंदर्य आणि नागरिकांमध्ये पर्यावरण जागरूकता वाढण्यास मदत होईल.”

चर्च ऑफ गॉडने आतापर्यंत नाशिकमध्ये स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण उपक्रम, आपत्कालीन मदत आणि सांस्कृतिक देवाणघेवाण असे बरेच कार्यक्रम केले आहेत, ज्यामुळे स्थानिक लोकांशी चर्च ऑफ गॉड संस्थेचे चांगले संबंध प्रस्थापित झाले आहेत. या उपक्रमांसाठी, राज्यसभेचे खासदार, महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य, पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक आणि मुंबईचे महापौर यांनकडून संस्थेला पुरस्कार देऊन कौतुक देखील करण्यात आले आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!