Homeआरोग्यनवीन जिल्हा व सत्र न्यायालय इमारत सात मजली, 44 न्यायालय खोल्या, काही...

नवीन जिल्हा व सत्र न्यायालय इमारत सात मजली, 44 न्यायालय खोल्या, काही स्वतंत्र कोर्ट, इतर दालने, ग्रंथालय आणि भव्य ऑडिटोरियमने सुसज्ज!

सरन्यायाधीश मा.गवई सर यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या नूतन आधुनिक इमारतीचे फित कापून व कोनशिला अनावरण करुन उद्घाटन..

पोलीस वार्ता, नाशिक : आज 27 सप्टेंबरला नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचे उद्घाटन व वाहनतळाचे भूमिपूजन सरन्यायाधीश मा.भूषण गवई सर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळ मा. सरन्यायाधीश म्हणाले की, देशातील नागरिकांना राजकीय अधिकार देण्यासोबतच सामाजिक आणि आर्थिक समानता देण्याची गरज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती. आजच्या काळात ही समानता निर्माण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस सरन्यायाधीश गवई सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि संविधान उद्धेशिकेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सरन्यायाधीश मा.गवई सर यांच्या हस्ते जिल्हा न्यायालयाच्या नूतन आधुनिक इमारतीचे फित कापून व कोनशिला अनावरण करुन उद्घाटन केले गेले. त्यानंतर मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली.
कार्यक्रमादरम्यान नाशिक वकील संघाने तयार केलेला माहितीपट दाखविण्यात आला. तसेच हेरिटेज बोर्डचे अनावरण तसेच हेरिटेज बुकचे प्रकाशन देखील केले गेले. स्थानिक वकिलांनी संपादित केलेल्या ज्युडीसिअरी: पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर या पुस्तकाचे, ‘मविप्रचे शिल्पकार: ॲड. बाबुराव ठाकरे’ या ग्रंथाचे, लाईफ अँड लॉ या संपादित पुस्तकाचे आणि प्रॅक्टिकल गाईड, गार्डियन द रिपब्लिक या पुस्तकांचे प्रकाशन सरन्यायाधीश मा.भूषण गवई सर व आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच या आधुनिक इमारत उभारणीसाठी सहकार्य करणारे राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाचे विलास गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, मुख्य वास्तुविशारद चेतन ठाकरे, कार्यकारी अभियंता उदय पालवे, विनोद शेलार, ज्येष्ठ वास्तुविशारद अजय दाते, हर्ष कन्स्ट्रक्शनचे विलास बिरारी आणि जयवंत बिरारी तसेच ज्येष्ठ विधीज्ञ का. का.घुगे, श्री.पवार, वनारसे आदींचा सत्कार सरन्यायाधीश मा.गवई सर यांच्या हस्ते करण्यात आला.
सरन्यायाधीश मा.गवई सर यांनी भाषणात नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे कौतुक केले. महाराष्ट्रातील न्यायालयांच्या पायाभूत सुविधांविषयी चर्चा होते. येथील पायाभूत सुविधा या निश्चितपणे चांगल्या आहेत. देशातील सर्व जिल्हा न्यायालय इमारतींमध्ये ही इमारत अतिशय सुंदर अशी बनली आहे. 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती असताना या इमारतीच्या भूमिपूजनाला उपस्थित होतो आणि आज माझ्याच हस्ते उद्घाटन होणे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे असे ते म्हणाले.
नवीन जिल्हा न्यायालय इमारत वैशिष्ट 
» सात मजली पर्यावरणपूरक इमारत.
» एकूण 44 न्यायालयांचा समावेश.
» पोक्सो, महिलांसंदर्भातील खटले, एटीएस व सीबीआयसाठी स्वतंत्र कोर्ट.
» व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा.
» दिव्यांगनुकूल वास्तू.
» वकिलांसाठी प्रशस्त दालने व ग्रंथालय.
» 350 ते 400 व्यक्तींची क्षमता असलेले भव्य ऑडिटोरियम असेल.
» आधुनिक अभिलेख कक्ष, प्रतीक्षालय व प्राथमिक उपचार केंद्र.
» स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष.
» पीडित व साक्षीदारांसाठी सुरक्षित व्यवस्था.
» दीड हजार दुचाकी व साडेचारशे कार पार्किंगची क्षमता.
» टायपिस्ट, झेरॉक्स, न्यायालयीन कर्मचारी, वकील परिषदेसाठी स्वतंत्र जागा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोरखेडा चौघा बालकांच्या हत्याकांडात आरोपी दोषी; शिक्षेकडे राज्याचे लक्ष

0
भुसावळ : रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड प्रकरणात विशेष पोक्सो (फास्ट ट्रॅक) न्यायालयाने आरोपी महेंद्र सिताराम बारेला याला दोषी ठरविले...

स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त भगूरकरांसाठी आनंदाची बातमी, भगूरच्या दिशेने होणार रेल्वे ओव्हरब्रिज

रेल्वे प्रशासनाने हा ओव्हरब्रिज पुन्हा भगूरच्या दिशेने वळवण्यास मंजुरी दिली असून त्याचे नवीन डिझाईन स्वरूप भगूर नगरपरिषदेकडे प्राप्त झाले आहे.. पोलीस वार्ता, देवळाली : नाशिक...

बनावट कागदपत्रांवर नोकरी? पैसे उकळल्याचा आरोप; महाजनको रुग्णालयातील प्रकार चर्चेत

0
भुसावळ : तालुक्यातील दिपनगर येथील महाजनको औष्णिक विद्युत केंद्र रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाल्याचा धक्कादायक दावा सूत्रांकडून करण्यात आला आहे....

केले के व्यापारी बनकर पहुंचे पुलिसकर्मी,खेत में उग रहा था गांजा

0
बुरहानपुर रमाकांत मोरे।  जिले की शाहपुर पुलिस ने एक अनोखी रणनीति अपनाकर अवैध गांजा खेती का भंडाफोड़ किया है। मुखबिर से सूचना मिलने के बाद...

विषारी दारूकांडातील मृतांच्या कुटुंबीयांची आमदार रोहित पवारांनी घेतली भेट; दोशींच्या चौकशीची मागणी!

मृत्यू विषारी दारूमुळे झाला असताना संबंधित शासकीय यंत्रणांचे कुटुंबीयांना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे कारण.. पोलीस वार्ता, पुणे : हडपसर परिसरात बनावट दारूमुळे मृत्यू झालेल्या मृत...

error: Content is protected !!