Homeआरोग्यमनसेच्या आयोजित नवरात्रोत्सव गरबा कार्यक्रमात 'तारक मेहता' सीरियल मधील 'टप्पू सेने'ची हजेरी!

मनसेच्या आयोजित नवरात्रोत्सव गरबा कार्यक्रमात ‘तारक मेहता’ सीरियल मधील ‘टप्पू सेने’ची हजेरी!

मनसेच्या गरबा महोत्सवात ‘तारक मेहता’ मालिकेतील कलाकारांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी वणीकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी..

पोलीस वार्ता, वणी : शारदीय नवरात्रोत्सव म्हटले की, गरबा-दांडिया कार्यक्रमांची धूम असणारच, यंदाही वणीत ठिकठिकाणी गरबा-दांडिया महोत्सव आयोजित केले असून नऊ दिवस कार्यक्रम रंगणार आहेत.

यंदा वणी शहरात नवरात्रोत्सव कार्यक्रमात आकर्षणाचे ठरलेले ठिकाण म्हणजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला ‘भव्य मनसे गरबा, महोत्सव 2025’ हा महोत्सव 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर पर्यंत रोज सायं. 6 ते रात्री 10 वाजे पर्यंत सुरू राहणार असून मनसे नेते राजू उंबरकर यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले आहे. त्यांनी कार्यक्रमा विषयी माहिती देतांना सांगितले की, कार्यक्रमाचा हेतू आपल्या संस्कृतीचे जतन करणे व अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणणे व बंधुभाव, सलोखा समाजात राखणे हाच आहे.
तसेच गरबा कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटींचे आगमन हा नवरात्री उत्सवाचा एक लोकप्रिय भाग बनला आहे, जिथे बॉलिवूड आणि इतर क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्ती सहभागी होतात. सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढते आणि ते पारंपारिक गरबा आणि दांडिया नृत्यात सामील होऊन उत्सवात रंग भरतात. याच अनुषंगाने मनसेच्या वतीने आयोजन केलेल्या ‘वर्ष 2025 गरबा महोत्सव’ कार्यक्रम प्रसंगी दि.29 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांसाठी प्रमुख आकर्षण म्हणून सब टीव्ही चॅनलवरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ यातील टीव्ही ॲक्टर यांना आमंत्रित केले होते. मालिकेतील ‘टप्पू सेना’ म्हणजे टप्पू, पिंकू आणि गोगी या भूमिका साकारणारे टप्पू- नितीश भालुनी, पिंकू- अझर शेख, गोगी- समया शाह ह्या कलाकारांनी येऊन मनसेच्या राम शेवाळकर परिसर, वणी येथील गरबा महोत्सवाची शोभा वाढवली. तसेच मराठी सिने अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी देखील दि.26 सप्टेंबर रोजी ह्या गरबा कार्यक्रम उपस्थित राहून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. यावेळी कलाकारांचे स्वागत कुमारी. मुक्ता राजू उंबरकर यांनी केले. तसेच कलाकारांनी प्रेक्षकांशी संवाद साधला आणि स्पर्धकांसोबत गरबा नृत्यात सहभाग घेतला, या कलाकारांना पाहण्यासाठी भेटण्यासाठी वणीकरांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे वणी पोलिसांनी बंदोबस्त वाढवून गर्दीवर लक्ष ठेवले होते.
या आयोजित गरबा महोत्सव कार्यक्रमाची प्रस्ताविका वणी मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी पूर्ण केली. तसेच सूत्रसंचालनाची जबाबदारी हरीश कामारकर यांनी पार पाडली. आणि ‘भव्य मनसे गरबा महोत्सव-2025’ या समितीचे अध्यक्ष साहिल सलाट यांनी आपल्या शब्दात सर्वांचे आभार मानले. यावेळी वणी शहर मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता टीम : दिवाकर साखरकर, वणी (यवतमाळ)
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात बाप्पाची स्थापना; एकतेचा संदेश

0
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

error: Content is protected !!