सर्व कामांचे एकाच ठिकाणी निरीक्षण आणि नियंत्रण करता येणार आहे. ही प्रणाली वापरण्यास सुलभ आणि उपयुक्त आहे..
पोलीस वार्ता, नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा 2027 प्राधिकरणामार्फत जिल्हा परिषदेच्या सभागृहात प्रकल्प व्यवस्थापन नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माहिती प्रणालीत (PMIS) डेटा अद्ययावत करणेबाबत आयोजित प्रशिक्षण सत्रात आयुक्त शेखर सिंह म्हणाले, कुंभमेळ्यातील सर्व प्रकल्पांचे नियोजन, देखरेख आणि प्रगती तपासण्यासाठी व्यवस्थापन माहिती प्रणाली तयार केली असून सर्व कामांचे एकाच ठिकाणी निरीक्षण आणि नियंत्रण करता येणार आहे. ही प्रणाली वापरण्यास सुलभ आणि उपयुक्त आहे.
डिजिटल प्रणालीत सर्व यंत्रणांना नवीन वापरकर्ते आणि संस्था जोडणे, माहिती बदलणे आणि त्यांना आवश्यक अधिकार देणे शक्य होणार आहे. यात नवीन प्रकल्पांची माहिती, नवीन प्रकल्पांची माहिती भरणे, अद्ययावत करणे, त्यातील कामांची यादी आणि पूर्ण होण्याच्या तारखा ठरविणे तसेच त्यांचे टप्पे व देयकांच्या टप्प्यांची माहिती नोंदविता येणार आहे. प्रकल्प किती टक्के पूर्ण झाला व त्याला टप्प्यानुसार लागलेला खर्च दर्शविता येणार आहे. तसेच प्रगती अहवाल दाखविण्यासाठी छायाचित्रे व व्हिडिओ अपलोड करता येणे यासह विभागाने दिलेल्या निरीक्षणांची नोंद पाहता येणार आहे. प्रकल्पा संदर्भातील अडचणी, अडथळे व इतर विभागांकडील प्रलंबित मुद्द्यांची नोंद करणे व त्याबाबत स्मरण करून देणे या सुविधा उपलब्ध आहेत. प्रत्येक प्रकल्पासाठी बाह्य तपासणी संस्था नेमली जाणार असून त्यांनी केलेली निरीक्षणे या प्रणालीत नोंदविता येणार असल्याचेही आयुक्त शेखर सिंह यांनी माहिती दिली.
सर्व प्रणाली अधिक सुलभ व्हावी यासाठी वापरकर्ता पुस्तिका, प्रत्येक टॅबची उपयुक्तता व त्याबाबतचे शार्ट व्हिडिओ तयार करून उपलब्ध केले जातील. प्रणाली वापराबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्ती नियुक्त केले जाणार आहे. यावेळी महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करीष्मा नायर व सर्व यंत्रणांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
भुसावळ : येथील बाजारपेठ पोलिस ठाण्यात गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने पोलिस आणि नागरिकांमधील सलोखा व संवाद अधिक दृढ करण्यासाठी पोलिस ठाण्यात...
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान
बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी..
पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...