Homeआरोग्यविरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची...

विरार इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा 17 वर, मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर

फक्त 15 वर्षे जुनी 2012 मध्ये बनलेली इमारत कशी काय कोसळते? इमारतीत एकूण 50 फ्लॅट होते त्यातील जो भाग कोसळला त्यात 12 फ्लॅट होते..

पोलीस वार्ता, ठाणे : राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह असताना पालघर जिल्ह्यातील विरार भागातील रमाबाई अपार्टमेंट ही चार मजली इमारत दुर्घटनाग्रस्त झाली, मंगळवारी दि.26 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 12.05 वाजेच्या सुमारास इमारतीचा मागील भाग कोसळला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. फक्त 15 वर्षे जुनी 2012 मध्ये बनलेली इमारत कशी काय कोसळते हा सगळ्यांना प्रश्न पडला आहे. इमारतीत एकूण 50 फ्लॅट होते त्यातील जो भाग कोसळला त्यात 12 फ्लॅट होते.

बचाव कार्य चालू असून बुधवारी ढिगाऱ्याखालून 20 ते 25 जण अडकल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. इमारत अरुंद गल्लीत असल्याने येथे रेस्क्यू ऑपरेशनसाठी गाडी आणि रुग्णवाहिका आत पोहोचने अवघड झाले आहे. त्यामुळे एनडीआरएफच्या टीमला मॅन्यूअली रेस्क्यू ऑपरेशन करावं लागत असून कामात बराच वेळ लागतो आहे.
नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालेला आहे, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे आणि मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. या सर्व कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, शासनाकडून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली आहे. गेल्या 48 तासांपासून सतत एनडीआरएफ टीमच्या मदतीने हे बचाव कार्य असून पुढचे काही तास ते चालू राहील. आतापर्यंत 9 जणांना सुरक्षित वाचविण्यात यश आले आहे.
स्थानिकांच्या सांगण्यानुसार वसई विरार महानगरपालिकेने (VVMC) तक्रार दाखल केल्यानंतर विरार ठाणे पोलीसांनी बांधकाम व्यावसायिक नितल गोपीनाथ साने आणि या अपघातासाठी जबाबदार असलेल्या जमीन मालकाविरुद्ध महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना कायद्याच्या कलम 52, 53 आणि 54 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 105 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी बिल्डरला अटक केली आहे. आतापर्यंत बाहेर काढलेले आणि ओळख पटवलेल्या मृतांची नावे 1)आरोही ओंकार जोविल (24), त्यांची एक वर्षाची मुलगी 2) उत्कर्षा जोविल, 3) लक्ष्मण किस्कू सिंग (26), 4) दिनेश प्रकाश सपकाळ (43), 5) सुप्रिया नेवाळकर (38), 6) अर्णब निवलकर (11) आणि 7) पार्वती सपकाळ(60) 8) दीपेश सोनी ( 41), 9) सचिन नेवाळकर (40), 10) हरीश सिंग बिष्ट (34), 11) सोनाली तेजाम (41), 12) कशिश पवन सहेनी (35), 13) शुभांगी पवन सहेनी (40), 14) गोविंद सिंग रावत (28), 15) दीपक सिंग बोहरा (२५) अशी आहेत.

✍️पोलीस वार्ता प्रतिनिधी: दिनेश पाटील, ठाणे, संपर्क: 8097983334
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!