Homeआरोग्यमनपा आयुक्त श्रीमती मनिषा खत्री यांना जेलरोड प्रभागातील मनपा सुविधा पुरवण्याची विनंती..

मनपा आयुक्त श्रीमती मनिषा खत्री यांना जेलरोड प्रभागातील मनपा सुविधा पुरवण्याची विनंती..

नागरिक तक्रार करून देखील नाशिकरोड विभागीय महापालिका अधिकारी कामे करत नाहीत किंवा तसे संबंधित विभागांना तसे आदेश देत नाही..

पोलीस वार्ता, नाशिक : सध्या शहरात महानगरपालिकेवर प्रशासक सत्ता असून लोकप्रतिनिधी म्हणजे नगरसेवक पदे रिक्त आहेत, त्यामुळे नागरिकांचे प्रश्न हे दिवसेंदिवस वाढत चालले असून वेळोवेळी तक्रार करून देखील महापालिका ते सोडवण्यास असक्षम दिसत आहे.
पावसाळ्यात देखील जेलरोड, नाशिकरोड भागात कमी दाबाने पाणी येण्याची समस्या, रस्त्यांमध्ये पडलेले मोठमोठे खड्डे, ड्रेनेच्या समस्या, रस्त्यांचे बंद पडलेले पथदिवे, आरोग्याच्या समस्या औषध फवारणी, सार्वजनिक स्वच्छतागृहांचीरस्त्याभोवती वाढलेले गवत व झाडी-झुडपे, अनाधिकृत बांधकामे आणि बाजारातील रस्त्यांवरचे अतिक्रमण हे व इतर अनेक प्रश्न नागरिकांसमोर असताना तक्रार करून देखील नाशिकरोड विभागीय महापालिका अधिकारी कामे करत नाहीत किंवा तसे संबंधित विभागांना आदेश देत नाही.
नाशिकरोड भागातील प्रभाग क्र-18 मध्ये पंचक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेले महिला प्रसूती विभाग हे गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची गैरसोय होत आहे. वेळोवेळी मागणी करून देखील नाशिकरोड मनपा अधिकारी यावर लक्ष देत नाही. प्रभागातील बहुतेक रस्ते खड्ड्यांनी व्यापले असून त्यात पडून नागरिक किरकोळ जखमी होत आहे. शनी मंदिर ते राजराजेश्वरी कार्यालय रस्त्यावर अनाधिकृत भाजीपाला मार्केट बसत असून तेथून रोज वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. मनपाने त्यांना पर्यायी जागा द्यावी. पंचक गावातील सार्वजनिक शौचालयात नियमित सफाई केले जात नाही. तसेच तिथे लाईटची सोय नाही. प्रभागात होणाऱ्या कमी दाबाच्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त आहे. मनपा शाळेची संरक्षण भिंत पडली असून शाळा व विद्यार्थी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा राहिला आहे.
त्यातच नव्याने पंचक गाव परिसरातील गोदावरी नदी काठच्या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या (एसटीपी) वाढीव कामांसाठी अवजड मोठ्या वाहनांच्या वाहतुकीमुळे रहदारीच्या लहान गावकरी रस्त्यावर नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडी-झुडपे वाढली असून त्यात रस्त्याचे खड्डे यामुळे नागरिकांना या रस्त्यांवर ये-जा करणे कठीण झाले आहे. याच संदर्भात प्रभाग क्र.18 मधील सर्व समस्यांवर नाशिक मनपा आयुक्त श्रीमती. मनिषा खत्री यांनी त्वरित लक्ष देऊन त्यांचे निराकरण करावे यासाठी त्यांना दि.25 सप्टेंबर 2025 रोजी पंचक रहिवाशांकडून निवेदन देऊन विनंती करण्यात आली.
यावेळी पंचक येथील मा.नगरसेवक व सभापती ॲड.सुनील(आण्णा) बोराडे, वि.का.सोसा. ज्येष्ठ संचालक शंकरराव बोराडे, रा.काँ युवक शहर सरचिटणीस गणेश मोरे, वि.का.सो. संचालक कैलास बोराडे, प्रवीण बोराडे, नितीन बोराडे, गोरख बोराडे, योगेश मुळाने, कल्पेश(बबलू) बोराडे, प्रसाद बोराडे, भाऊसाहेब बोराडे, नरहरी कसबे आदी ग्रामस्थ व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!