Homeआरोग्यतालुक्यात ओल्या दुष्काळाचे पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी,...

तालुक्यात ओल्या दुष्काळाचे पंचनामे करून हेक्टरी 50 हजार रुपये मदत जाहीर करावी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची मागणी!

सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीवर गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी त्यांनी ‘झाडांचा हार परिधान’ केल्याचे सांगितले..

पोलीस वार्ता, वणी : यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. काढणीला आलेले सोयाबीन, कपाशीसह इतर हंगामी व नगदी पिके उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांवर ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे. यासाठी वणी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार यांच्या वतीने वणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी ‘सोयाबीन पिकाच्या झाडांचा हार’ घालून दिलीप भोयर हे वणी उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यासाठी पोहचले होते. सरकारने शेतकऱ्यांच्या नुकसानीवर गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी त्यांनी ‘झाडांचा हार परिधान’ केल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले “शेतकरी पीक पिकवून, कष्टाने त्याचे कुटुंब चालवतो, पण जेव्हा कोरड्या व ओल्या दुष्काळाने उभी पिके करपून जातात, नुकसानग्रस्त होतात तेव्हा सरकारकडून पंचनामा होऊन मदत मिळायला महिने उलटून जातात. पण जर एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात चुकून गांजाचे रोप आढळले, तर त्याचा पंचनामा दहा मिनिटांत होतो, गुन्हाही लगेच दाखल केला जातो. शेतकऱ्याला गुन्हेगार ठरवणारे प्रशासन तेव्हा तत्पर असते, मग पिकांचे नुकसान झाल्यावर त्याच प्रशासनाला इतका जास्त वेळ का लागतो? शेतकऱ्याला न्याय देणे व मदत भरपाई देणे सरकारची जबाबदारी आहे आणि ती त्यांनी पूर्ण करावी.
तसेच निवेदनातून राष्ट्रवादी काँग्रेसने मागणी केली आहे की, वणी उपविभागातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी किमान 50 हजार रुपये मदत जाहीर करावे. पंचनामा करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट मदत रक्कम जमा करण्याचे आदेश द्यावेत, निवेदनाची दखल न घेतल्यास वणी राष्ट्रवादी काँग्रेस(श.प) कडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे देखील म्हटले आहे.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस(श.प) राज्य संघटन सचिव, रज्जाक पठाण, ता.अध्यक्ष राजू वांढरे, युवा आघाडी ता.अध्यक्ष सूर्यवीर चिकटे, शहराध्यक्ष विनोद ठेंगणे , तालुका सचिव प्रदीप खोब्रागडे, मंगेश गोरे, कुंड्रा सरपंच विजय ठावरी, अनिल साखरकर, प्यारेलाल मेश्राम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

✍️पोलीस वार्ता, प्रतिनिधी: नरेश ठाकरे, (वणी) यवतमाळ, संपर्क: 9588664532
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!