Homeक्राईमशहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पोलीस पथकाकडून घरपोडीचे आठ गुन्हे उघड, आरोपींना अटक

शहर गुन्हेशाखा युनिट-1 च्या पोलीस पथकाकडून घरपोडीचे आठ गुन्हे उघड, आरोपींना अटक

एकुण 6,31,700/- रुपये किंमतीचे सोने व रोख रक्कम जप्त करुन घरफोडीचे एकूण 8 गुन्हे उघडकीस आले आहे..

पोलीस वार्ता, नाशिक | शहर परिसरातील दाखल चोरीच्या व घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपींना शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना शहर पोलीस आयुक्त मा. संदीप कर्णिक यांनी गुन्हेशोध पोलीस पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार तपास करत असताना दि.4 सप्टेंबर रोजी शहर पोलीस गुन्हेशाखा युनिट-1 च्या पोह. प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, यांना गुप्त बातमी मिळाली की, संशयित लकी विल्सन भंडारे व त्याचे साथिदार हे गु.र.नं. 379/2026 भा.न्या.सं. कलम 305(अ), 331(3) (4) या गुन्हयांतील चोरीचा माल विकण्याकरीता व्हि. एन. नाईक कॉलेज जवळ डोंगरीवस्तीगृह मैदान परिसरात येणार आहे. ही बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.अंचल मुदगल यांना देताच त्यांनी बातमीची खात्री करून पुढील कारवाई करण्याचे आदेश दिले.

गुन्हेशाखा युनिट-1 चे पोउपनि. चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमीज शेख, श्रेपोउनि किरण शिरसाठ, पोह प्रशांत मरकड, प्रदिप म्हसदे, प्रविण वाघमारे, संदिप भांड, विशाल काठे, विशाल देवरे, मिलींदसिंग परदेशी, रमेश कोळी, नाझिमखान पठाण, पोअं. राम बर्डे, अमोल कोष्टी, मपोह. शर्मीला कोकणी, मपोअं मनिषा सरोदे, वापोअं. समाधान पवार यांचे पोलीस पथक तयार करून ते माहिती मिळालेल्या ठिकाणी पाठवण्यात आले. पथकाने आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. आरोपींनी त्यांची नावे व माहिती सांगितली.
1) लकी विल्सन भंडारे, वय-20 वर्षे, रा. शमोवेल बंगला, ख्रिश्चनवाडी, कॅनडा कॉर्नर, शरणपुर रोड, नाशिक
2) उमेश कैलास ठोके, वय-23 वर्षे, रा. शमोवेल बंगला, ख्रिश्चनवाडी, कॅनडा कॉर्नर, शरणपुर रोड, नाशिक
3) अजय गोपिचंद बच्छिरे, वय-20 वर्षे, रा. शमोवेल बंगला, ख्रिश्चनवाडी, कॅनडा कॉर्नर, शरणपुर रोड, नाशिक

आरोपींनकडून दाखल गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांना आणखीन विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली की, त्यांनी एकत्रीत नाशिक शहरातील गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत एकुण आठ घरफोडी व चोरीचे गुन्हे केले आहेत. त्यांचेकडुन एक कॅमेरा, पुरातन दोन नाणे, 5 सोन्याच्या लगड 45 ग्रॅम वजनाच्या व 58,000/- रोख रक्कम तसेच सोन्याची लगड तयार करण्याची साहित्य असा एकुण 6,31,700/- रुपये किंमतीचे सोने व रोख रक्कम जप्त करुन घरफोडीचे शहरातील एकूण 8 गुन्हे उघडकीस आले आहे. त्यातील मागील दाखल इतर गुन्हे पुढील प्रमाणे..
1) गुरनं. 359/2026 भा.न्या.सं. कलम 305 (अ), 331(3) (4)
2) गुरनं. 360/2026 भा.न्या.सं. कलम 305 (अ), 331(4)
3) गुरनं. 363/2026 भा.न्या.सं. कलम 305 (अ), 331(3) (4)
4) गुरनं. 374/2026 भा.न्या.सं. कलम 305 (अ), 331(3) (4)
5) गुरनं. 376/2026 भा.न्या.सं. कलम 305 (अ), 331(3) (4)
6) गुरनं. 310/2026 भा.न्या.सं. कलम 305 (अ), 331(3) (4)
7) गुरनं. 344/2026 भा.न्या.सं. कलम 305 (अ), 331(3) (4)

सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त मा.संदिप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मा.किरणकुमार चव्हाण (गुन्हे), सहा. पोलीस आयुक्त संदिप मिटके ( गुन्हेशाखा) यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हेशाखा युनिट -1 च्या पोलीस पथकाने मिळून केली आहे. पथकात सपोउनि योगीराज गायकवाड, रविंद्र आढाव, देविदास ठाकरे, उत्तम पवार, रोहिदास लिलके, मुश्रीफ शेख, मुक्तार शेख, गोरक्ष साबळे, आप्पा पानवळ, राहुल पालखेडे, गणेश रूमाले, जगेश्वर बोरसे, सुनिल भोसले, श्रीकांत सुर्यवंशी, समाधान शिंदे, सुकाम पवार यांचा देखील समावेश होता.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

जेष्ठ नागरीक संघ, भगूर यांच्या वतीने शिक्षकांचा गौरव व सत्कार

0
विद्यार्थी घडवण्याचे काम शिक्षक करतात, समाजाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करणे आवश्यक.. पोलीस वार्ता, नाशिक | शिक्षण दिननिमित्त शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमाचे आयोजन...

error: Content is protected !!