Homeआरोग्य'नाशिक आक्रोश मोर्चा' च्या जनजागृतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहरात...

‘नाशिक आक्रोश मोर्चा’ च्या जनजागृतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहरात पत्रके वाटप

‘नाशिक आक्रोश मोर्चा’साठी स्वतः शरदचंद्र पवार साहेब व खासदार सुप्रिया सुळे नाशिक मध्ये दाखल झाले आहे..

पोलीस वार्ता, नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने नाशिक शहरात दि.15 सप्टेंबर 2025 रोजी ‘नाशिक आक्रोश मोर्चा’ आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चासाठी स्वतः शरदचंद्र पवार साहेब व खासदार सुप्रिया सुळे नाशिकमध्ये दाखल झाले आहे. पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांच्या वतीने शहरातील वेगवेगळ्या प्रभागांमध्ये ‘नाशिक आक्रोश मोर्चा’ चे पत्रक वाटून नागरिकांमध्ये मध्ये जोरदार जनजागृती केली जात आहे. तसेच मोर्चात हजारोच्या संख्येने शामिल होण्याचे आवाहन देखील केले जात आहे. मोर्चाचा मार्ग शहरातील गोल क्लब मैदान ते कलेक्टर कार्यालय असा असणार आहे.
या मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन निदर्शनाने शेतकऱ्यांच्या विविध समस्या आणि विषयांवर सरकारला जाब विचारला जाणार आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, कांद्याचा भाव व निर्यात, कापसाचा भाव व निर्यात, आयात, द्राक्ष उत्पादन, व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक, शेतीमालाला हमीभाव, कृषी यंत्रांना जीएसटी, शेतकऱ्यांची नैसर्गिक हानी, दुधाचे हमीभाव, कृषी विमा, ओला-कोरडा दुष्काळ, बोगस खाते व बियाणे, साखर कारखान्यांचे प्रश्न असे अनेक विषय मोर्चात मांडण्यात येणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या नाशिकरोड पदाधिकाऱ्यांनी देखील शनिवारी 13 सप्टेंबर रोजी प्र.क्र-18 मध्ये प्रभागातील राजराजेश्वरी चौक, पंचक भाजी मार्केट, पंचक गावसह परिसरात आगामी 15 सप्टेंबरच्या ‘नाशिक आक्रोश मोर्चा’ चे पत्रक वाटून लोकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी पक्षाचे प्रभाग अध्यक्ष पंकज जाधव, शहर युवक सरचिटणीस गणेश मोरे, शहर संघटक युवक प्रवीण बोराडे, नाशिकरोड उपाध्यक्ष निलेश जगताप, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष बाबासाहेब अस्वले, नाशिकरोड विभाग युवक अध्यक्ष योगेश लोखंडे, नाशिकरोड सरचिटणीस कुणाल पाठक, प्रकाश वाघमारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!