Homeआरोग्यरावेर–फैजपूरमध्ये भडकावू भाषण, जातीय तेढ निर्माण करण्याचा समाजकंटकांकडून प्रयत्न?

रावेर–फैजपूरमध्ये भडकावू भाषण, जातीय तेढ निर्माण करण्याचा समाजकंटकांकडून प्रयत्न?

कोणत्याही धर्म, समाज किंवा व्यक्तीविरुद्ध द्वेष पसरवणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रवृत्तीला थारा देणे म्हणजे समाजात जातीय तेढ निर्माण करणे..

पोलीस वार्ता, जळगाव : जिल्ह्यात रामनवमी निमित्त दि.26 मार्च 2026 रोजी रावेर येथील महालक्ष्मी मंदिर परिसरात तसेच फैजपूरच्या खंडेराव वाडी येथे झालेल्या कार्यक्रमांच्या वेळी काही लोकांनी समाजात द्वेष निर्माण करण्याच्या दृष्टीने केलेले भाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले. या भाषणात इतर समाजात द्वेष, भीती व तणाव निर्माण करणारे वक्तव्य असल्याने याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 196, 299, 353 तसेच 152, 179, 270, 202, 352 आणि आयटी ॲक्ट 2000 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी काही संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.
सदर प्रकरण घडून 8 ते 10 दिवस उलटून देखील अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने पोलीसांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे. सुप्रीम कोर्टाच्या In Re: Hate Speech (2023) प्रकरणानुसार, हेट स्पीच आढळल्यास पोलिसांनी कोणतीही तक्रार येण्याची वाट न पाहता स्वतःहून (suo motu) FIR नोंदवणे बंधनकारक आहे.
कोणत्याही धर्म, समाज किंवा व्यक्तीविरुद्ध द्वेष पसरवणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रवृत्तीला थारा देणे म्हणजे समाजात जातीयतेचे ठिणगी लावण्यासारखे आहे. असे जळगाव एकता संघटनाचे फारुक शेख व कुर्बान शेख, कौमी एकता संघटना, फैजपूर यांचे म्हणणे आहे. जर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली नाही, तर जिल्हाभरात लोकशाही मार्गाने संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच पोलिसांविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल. फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांनी संघटनांना वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन व संपूर्ण माहिती घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या आश्वासन दिले आहे.

यावेळी संघटनांचे फारुक शेख, अनिस शहा, नजमोद्दीन शेख, ताहेर शेख, जकी पटेल, सईद शेख, अकील शेख, अमीन शेख (जळगाव), एडवोकेट अल्तमश कालू (रावेर) तसेच कुर्बान शेख, कलीम मेंबर, फारूक अब्दुल्ला, अमीन शेख, रियाज साबीर, जमालोद्दीन, शेख निसार, अख्तर पैलवान, सुलतान शेख, जाबीर शेख, रज्जाक शेख, इकबाल शेख, जफर अली, अजगर अली, वसीम शेख, गफार, काशीफ शेख, आसिफ, दानिश शेख, मोहसीन शेख (फैजपूर) आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद

0
व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी २४ तासांत तिघे जेरबंद दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्Paragraphया हल्ल्यानंतर तरुणाचा...

दोघांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी; विधीसंघर्षित बालक बाल न्याय मंडळाकडे भुसावळ : शहरातील व्हीआयपी कॉलनीत झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर तरुणाचा मृत्यू झाल्याच्या खळबळजनक प्रकरणात भुसावळ पोलिसांनी...

बोरखेडा हत्याकांड : ‘रेअरेस्ट ऑफ रेअर’ ठरवत फाशीची मागणी; शिक्षेचा निकाल आज

0
उज्वल निकम यांचा ४५ मिनिटांचा जोरदार युक्तिवाद; आरोपीकडून किमान शिक्षेची विनंती भुसावळ - रावेर तालुक्यातील बोरखेडा येथे १५ ऑक्टोबर २०२० रोजी घडलेल्या चार निष्पाप भावंडांच्या...

error: Content is protected !!