Homeआरोग्यबनावट खवा आणि पनीर घेताय की काय? अन्न व औषध प्रशासनाची शहरात...

बनावट खवा आणि पनीर घेताय की काय? अन्न व औषध प्रशासनाची शहरात भेसळयुक्त पदार्थांवर कारवाई..

नाशिक येथील मे. विराज एंटरप्रायजेस, त्रिमुर्ती चौक, सिडको या पेढीमध्ये बनवाट पनीर व खवा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती..

पोलीस वार्ता, नाशिक : सणासुदीच्या काळात दूध व दुग्धजन्य पदार्थ जसे पनीर, खवा, मावा इत्यादी खाद्यपदार्थांना मागणी असते. ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न’ सुरक्षिततेचा या मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने मिठाई व तत्सम पदार्थ तपासणी मोहिम जिल्ह्यात सुरू केली आहे. या तपासणी मोहिमेत एकूण रूपये 43 हजार 740 किंमतीचा पनीर व खवा यांचा साठा जप्त करण्यात आला असल्याची माहती अन्न व औषध प्रशासन सह आयुक्त (अन्न) दि.ज्ञा.तांबोळी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

अन्न व औषध प्रशासनाला 12 सप्टेंबर 2025 रोजी, नाशिक येथील मे. विराज एंटरप्रायजेस, त्रिमुर्ती चौक, सिडको या पेढीमध्ये बनवाट पनीर व खवा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार या पेढीची तपासणी करून पेढीमध्ये आढळून आलेला संशयित पनीरचा 129 किलो ग्रॅम व रूपये 38 हजार 700 किंमतीचा साठा तसेच 18 किलोग्रॅम रूपये 5 हजार 40 किंमतीचा खव्याचा साठा असा एकूण 43 हजार 740 रूपयांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या अन्न पदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत. व जप्त करण्यात आलेला पनीर व खव्याचा साठा हा नाशवंत असल्याने व परत उपयोगात येवू नये यासाठी त्यावर निळ टाकून नष्ट करण्यात आला आहे. प्रयोगशाळेकडून या अन्न पदार्थांचा अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.
सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील, उमेश सुर्यवंशी, अन्न सुरक्षा गुप्तवार्ता अविनाश दाभाडे यांनी सहाय्यक आयुक्त (अन्न) मनिष सानप, सह आयुक्त (अन्न) दिनेश तांबोळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाची पथके शहरातील पनीर व खवा उत्पादक यांच्यावर लक्ष ठेवणार असून अन्न व्यवसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा, नियमानुसार निर्गमित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे.
सण उत्सव काळात नागरिकांनी मिठाई व दुग्धजन्य पदार्थ खरेदी करतांना दक्षता घ्यावी. तसेच भेसळयुक्त अन्न पदार्थांसंदर्भात तक्रार तसेच गोपनीय माहिती असल्यास प्रशासनाच्या टोल फ्रि क्रमांक 1800222365 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

✍️पोलीस वार्ता संपादक: उमेश फिरके, नाशिक, संपर्क- 9637519059
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच स्वीकारताना खासगी व्यक्तीला पकडले

0
महसूल सहायकाच्या सांगण्यावरून लाचेची मागणी; एसीबीची कारवाई, दोन्ही संशयित ताब्यात जामनेर : शेतातील नवीन रस्ता मिळवून देण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी खासगी...

गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळांना पोलिसांच्या सूचना

0
डीजेच्या आवाजाबाबत नियमांचे पालन करण्याचे आवाहन; वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश भुसावळ : श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत, शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात...

रिपब्लिकन पक्षाच्या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड, अज्ञाताविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0
अज्ञात समाजकंटकाने या ऐतिहासिक बाकड्याची तोडफोड करून बाकड्याची पारंपरिक ओळख पुसण्याचा मिश्किल प्रयत्न केला.. पोलीस वार्ता, देवळाली | कॅम्प येथील मध्यवर्ती बसस्थानक येथे 40 वर्षांपूर्वी...

हुडको कॉलनीतील नाल्यात अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

0
भुसावळ : शहरातील हुडको कॉलनी परिसरातील रानातले महादेव मंदिराजवळील नाल्यात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. मृत व्यक्तीचे वय...

जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा

0
जागृत श्री हनुमान मंदिरात महादेव पिंडीची प्राणप्रतिष्ठा रजनी सावकारे यांच्या हस्ते शिवपिंडीचे पूजन; भाविकांची उपस्थिती भुसावळ : शहरातील स्टेशन रोड परिसरातील हितवर्धिनी सोसायटीसमोरील जागृती श्री हनुमान...

error: Content is protected !!