Homeआरोग्यपर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून 99 कोटी 14 लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात रामकाल...

पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून 99 कोटी 14 लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात रामकाल पथची उभारणी

‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेसमेन्ट’ योजनेंतर्गत 99 कोटी 14 लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथ..

पोलीस वार्ता, नाशिक : नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री नाशिकमध्ये उपस्थित झाले आहेत. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून ‘स्पेशल असिस्टंट टू स्टेटस् फॉर कॅपिटल इन्व्हेसमेन्ट’ योजनेंतर्गत 99 कोटी 14 लाख रुपये खर्चातून रामकुंडसह परिसरात साकारण्यात येणाऱ्या रामकाल पथचे आज दि.13 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमीपूजन संपन्न झाले.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कुंभमेळा मंत्री गिरीष महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार दिलीप बनकर, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कुंभमेळा अतिरिक्त आयुक्त कल्पना नायर, सहा. जिल्हाधिकारी अर्पिता ठुबे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी संकल्पचित्र आणि प्रतिकृतीच्या माध्यमातून रामकाल पथाची माहिती जाणून घेतली. रामकाल पथ प्रकल्पाच्या माध्यमातून रामकुंड मार्ग, रामकाल पथवरील संपूर्ण संरचनांचे संवर्धन, दर्शनी भागांचा जीर्णोद्धार तसेच पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. रामकुंड, सीता गुंफा, काळाराम मंदिर, राम लक्ष्मण गुंफा आणि इतर ऐतिहासिक मंदिर परिसराचे आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व प्रकल्पामुळे भाविकांपर्यंत पोहोचेल असे त्यांनी म्हटले.
नाशिक-त्र्यंबकेश्वर 2027 सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने नाशिकचे सांस्कृतिक महत्व जगभरात पोहोचविण्यासाठी शासनातर्फे मोठ्या प्रमाणात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या साह्याने हा प्रकल्प उभारला जात आहे. देशभरातून गोदातटी येणाऱ्या भाविकांसाठी आनंददायी अनुभव देण्याच्या दृष्टीने आणि या पवित्र स्थळाचे स्थान महात्म्य त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काळाराम मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार, सन्मान मंदिराच्या विश्वस्तांतर्फे करण्यात आला.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारिश की हल्की बौछार में हुआ गणेश जी का आगमन

0
बुरहानपुर जिले के ग्राम चापोरा के राजे मित्र मंडल द्वारा विगत बिस वर्षों से श्री गणेश उत्सव श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा के पास...

कर्मचारी संगठन संबंध भारतीय मजदूर संघ की जिला कार्यकारिणी का हुआ गठन !

0
नीमच (रमाकांत मोरे)  आज दिनांक 13 सितम्बर 2026 को मध्य प्रदेश बाह्य स्त्रोत विद्युत कर्मचारी संगठन संबद्ध भारतीय मजदूर संघ जिला इकाई नीमच की बैठक...

जनजाग्रति संस्था जल्द करेगी पत्रकार बंधुओं का सम्मान समारोह

0
बुरहानपुर जिले में दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक समाचार पत्र के एवं इलेक्ट्रॉनिक मीडिया एवं प्रेस फोटोग्राफरों का होगा सम्मान बुरहानपुर (रमाकांत मोरे) समाज सेवा के क्षेत्र...

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी पर्यावरणपूरक आरासीत बाप्पाची स्थापना!

0
पर्यावरणाचा समतोल राखत पारंपरिक आणि वस्त्रोद्योगाची सांगड घालणारी ही सजावट लक्षवेधी.. पोलीस वार्ता, भुसावळ | महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या निवासस्थानी गेल्या 15...

भगूरमध्ये आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते विकासकामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न!

0
दोन्ही कामांमुळे भगूरच्या विकासाला गती मिळणार आहे. देवळाळीच्या आमदार अहिरे म्हणाल्या.. पोलीस वार्ता, देवळाली | भगूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित स्मशानभूमी भूमिपूजन आणि मंडल अधिकारी कार्यालय...

error: Content is protected !!