अपघातात दुचाकी वरील दोघे जण जखमी, एकाच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला..

पोलीस वार्ता, भोर | तालुक्यातील सारोळा–वीर rastyavar सावरदरे गावच्या हद्दीत परभळ वॉशिंग सेंटरजवळ भरधाव एसटी बसने समोरून येणाऱ्या दुचाकी मोटर सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघे जण जखमी झाले असून त्यापैकी एकाच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, मंगळवार दि.14 जुलै 2026 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या एसटी बस क्र. MH06 S8298, चालक सचिन नारायण धनावडे, वय-40 वर्षे, रा. भोर, मूळ रा. काळदरी, ता.पुरंदर याने भरधाव वेगाने व रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून बस चालवत समोरून येणाऱ्या दुचाकीला, क्र. MH12 HW5534 धडक दिल्याने अपघात घडला.




































