Homeउद्योगभुसावळ शहरातील 5.70 लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपी मुद्देमालासह अटकेत!

भुसावळ शहरातील 5.70 लाखांची घरफोडी उघड; संशयित आरोपी मुद्देमालासह अटकेत!

चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व सुमारे 5.70 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेले होते..

पोलीस वार्ता, भुसावळ : शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या 5 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या घरफोडी गुन्ह्याचा अवघ्या दोन दिवसांत छडा लावण्यात भुसावळ पोलिसांना यश आले आहे. यात एका संशयित आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे 4 लाख 99 हजार 100 रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी वसीम अहमद अब्दुल बासित शेख (रा.फातिमा कॉलनी, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते दि.28 मार्च ते 30 मार्च दरम्यान घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. या काळात अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व सुमारे 5.70 लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासा दरम्यान पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे संशयित अमीर खान हबीब खान (वय-35, रा. न्युईदगा जवळ, भुसावळ) यास ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोनि. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भुसावळ पोलिसांची धडक कारवाई; गावठी कट्टा, दोन जिवंत राउंडसह दोघे जेरबंद

0
भुसावळ : येथील शहर पोलिसांनी धडक कारवाई करत जळगाव रोड परिसरातून गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे (राउंड) आणि धारदार चाकूसह दोन संशयितांना अटक केली....

काँग्रेसचे भीष्म पितामह अनंतराव थोपटे यांचे निधन; ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास  …

0
भोर प्रतिनिधी :- ( संतोष मोहिते )महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत, अभ्यासू आणि निष्ठावान नेतृत्व, राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि भोर - वेल्हा - मुळशी...

व्हीआयपी कॉलनी खूनप्रकरणी तपास वेगात; आरोपींकडून घटनास्थळी पुनर्रचना, उर्वरित तिघांचा शोध सुरू

0
भुसावळ शहरातील व्हीआयपी कॉलनीतील तरुणाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने फिरवत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून महत्त्वाची माहिती मिळविण्यासाठी घटनास्थळी पुनर्रचना केली. गुरुवारी रात्री...

बोरखेडा हत्याकांडातील आरोपीला दुहेरी फाशी

0
१०४ पानी निकालात आरोपीच्या क्रौर्यावर न्यायालयाचे ताशेरे; भुसावळ सत्र न्यायालयाच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा भुसावळ : राज्यभरात संतापाची लाट निर्माण करणाऱ्या बोरखेडा येथील चार निष्पाप भावंडांच्या...

१२ तासांत घरफोडीचा गुन्हा उघड; नागपुरातून तिघे आरोपी जेरबंद

0
१६.३४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई भुसावळ : भुसावळ शहरातील घरफोडीचा गुन्हा अवघ्या १२ तासांत उघडकीस आणत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने परराज्यातील...

error: Content is protected !!