Homeउद्योगमध्य रेल्वेच्या भुसावळ आरपीएफ व खंडवा जीआरपी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने बनावट...

मध्य रेल्वेच्या भुसावळ आरपीएफ व खंडवा जीआरपी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने बनावट दरोड्याचा केला पर्दाफाश!

दरोडा पूर्णपणे बनावट असून तो फिर्यादीने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने, नुकसान झाल्याचे दाखवण्यासाठी घडवलेला आहे..

पोलीस वार्ता, भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ रेल्वे सुरक्षा दलाने(RPF) सोन्याच्या दागिन्यांचा रुपये 1.82 कोटी किंमतीच्या बनावट दरोड्याचा पडदाफाश केला आहे. या प्रकरणात तपास करून संपूर्ण दरोडा उघड केला आहे. ही नियोजनपूर्वक बनावट चोरी असून यात चार संशयितांना अटक केली असून 72 तासांच्या आत रेल्वे पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सविस्तर मिळालेली माहिती अशी की, जबलपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गरीब रथ एक्सप्रेस, गाडी क्र-12187 यामधून दि.30 सप्टेंबर 2025, मंगळवार रोजी एक मोठी चोरीची घटना घडल्याची फिर्याद सागर पारेख यांनी छ.शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथील रेल्वे पोलीस (जीआरपी) ठाण्यात दिली होती. त्यानुसार गुरनं- 082/2025 भा.न्या.संहिता (बीएनएस) कलम 3(5) व 309(6) नुसार दाखल करण्यात आला होता. चोरीत 52 सोन्याच्या बांगड्या, 35 सोन्याच्या अंगठ्या असे एकूण 1.5 किलोग्रॅम वजनाचे सुमारे 1,82,00,000 रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. रेल्वे पोलिसांना तपास करत असताना समजले की, सदर घटना रेल्वेच्या खंडवा रेल्वे कार्यक्षेत्रात घडली आहे. त्यामुळे प्रकरण त्यांच्याकडे वर्ग करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने शुक्रवार दि.3 ऑक्टोबर 2025 रोजी रेल्वे जीआरपी पोलीस, खंडवा यांनी पुन्हा त्याच कलमानुसार गुन्हा क्र. 219/2025 नोंदवून तपासकरण्या कामी भुसावळ आरपीएफ पोलिसांची मदत मागितली. त्यानुसार वरीष्ठ विभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात रेल्वे गुन्हेशाखा आणि आरपीएफ पोलीस खंडवा व भुसावळ यांचे संयुक्त पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश मिळाले.
तपासात तांत्रिक विश्लेषणात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल ट्रॅकिंग, मोबाईल कॉल रेकॉर्ड (सीडीआर) आणि मार्ग नकाशा यांसारख्या आधुनिक गोष्टींचा तपास करून पथकाने संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून उघड केले की, नोंदवलेला दरोडा पूर्णपणे बनावट असून तो फिर्यादीने आपल्या काही साथीदारांच्या मदतीने रेल्वे पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी व चोरी होऊन नुकसान झाल्याचे दाखवण्यासाठी घडवलेला आहे.
आरोपींना रेल्वे पोलिसांना अटक करून चौकशी केली असता त्यांनी कबुली दिली की, घटना खरी वाटावी म्हणून त्यांनी स्वतःला दुखापत करून घेतली. संपूर्ण दरोडा बनावट असून सर्व सोन्याचे दागिने त्यांनी त्यांच्या साथीदार प्रवीण याच्याकडे कल्याण रेल्वे स्थानकावर सुपूर्द केले होते. त्यानुसार रेल्वे आरपीएफ पथकाने तत्काळ कारवाई करून प्रवीणला खंडवा रेल्वे पोलीस ठाण्यात बोलावले, तो दि.4 ऑक्टोबर 2025 रोजी संपूर्ण मुद्देमालासह खंडवा येथे हजर झाला. त्याच्याकडून रेल्वे पोलिसांनी मुद्देमाल ताब्यात घेतला.

या प्रकरणातील एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची माहिती,
1) सागर पारेख (वय-40), रा. नाशिक, झवेरी बाजार, मुंबई, महाराष्ट्र येथील R.B.Jewellers & Gold Ltd.LLP मध्ये भागीदार.
2) संजय कुमार (वय-27), रा. पाली जिल्हा, राजस्थान, सध्या राहणार मुंबई.
3) प्रवीण कुमार (वय-35), रा. सिरोही जिल्हा, राजस्थान, सध्या राहणार दिवा ईस्ट, ठाणे, मुंबई.
4) राकेश जैन (वय-53), रा. मलबार हिल्स, मुंबई.
सर्व चारही आरोपींना गुरनं- 219/2025 यात अटक करण्यात आली असून भुसावळ रेल्वे विभागचे आरपीएफ निरीक्षक प्रकाश चंद्रसेन यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सुरू आहे. भुसावळ आरपीएफ व खंडवा जीआरपी यांनी संयुक्त मिळून बनावट दरोड्याचा वेगवान उलगडा करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नाशिक शहर परिसरात पोलीस आयुक्तांकडून प्रतिबंधात्मक मनाई आदेश जारी

0
आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर महाराष्ट्र पोलीस कायदानुसार कारवाई होणार.. पोलीस वार्ता, नाशिक | शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त मा.संदीप कर्णिक...

लाचखोर पोलिस हवालदाराला चार वर्षांचा कारावास

0
दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या सापळ्यात अडकला; नाशिक न्यायालयाचा निकाल नाशिक | तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिस...

गणेश प्रतिमाओं के पुनः उपयोग की पहल में कुशवाहा आर्ट का सहयोग

0
ताप्ती सेवा समिति ने नितेश कडू कुशवाह का किया सम्मान बुरहानपुर  (रमाकांत मोरे) ताप्ती सेवा समिति बुरहानपुर द्वारा प्रतिवर्ष गणेश उत्सव के दौरान मां ताप्ती की...

महिला पत्रकारों पर हमले के विरोध में डीएम को सौंपा ज्ञापन।

0
निष्पक्ष जांच, दोषी पुलिसकर्मियों पर कार्रवाई और पत्रकार सुरक्षा कानून लागू करने की मांग। कलम और कैमरा को डराया नहीं जा सकता - नासिर जमीर...

मुख्यमंत्री जन-विश्वास अभियान अंतर्गत पांचवां क्षेत्र भ्रमण संपन्न

0
ग्राम पंचायत गढ़ताल में चौपाल लगाकर सुनी नागरिकों की समस्याएं विभिन्न स्टॉल के माध्यम से ग्रामीणों को किया लाभान्वित बुरहानपुर (रमाकांत मोरे) 11 सितम्बर, 2026/- मुख्यमंत्री...

error: Content is protected !!